Loksabha Election 2024 Result
Loksabha Election 2024 Result

Loksabha Election Result 2024 Live: रायबरेलीतून राहुल गांधी ४ लाख मताधिक्यानं विजयी, वाराणसीतून नरेंद्र मोदींनी मारली बाजी

संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाची मतमोजणी सकाळी आठ वाजल्यापासून सुरु झालीय. देशातील एकूण ५४३ जागांमध्ये एनडीए म्हणजेच भाजपच्या महायुतीने २७५ जागांवर आघाडी घेतली आहे.
Published by :

Loksabha Election 2024 Result Live : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाची मतमोजणी सकाळी आठ वाजल्यापासून सुरु झालीय. देशातील एकूण ५४३ जागांसाठी मतमोजणी सुरु असून एनडीए म्हणजेच भाजपच्या महायुतीने आघाडी घेतली आहे. इंडिया आघाडीनेही भाजपला टक्कर दिल्याचं पाहायला मिळत आहे. या लोकसभा निवडणुकीच्या निकालाची सविस्तर माहिती वाचा या लाईव्ह ब्लॉगमध्ये.

लोकसभेच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

कल्याण लोकसभेत श्रीकांत शिंदेंनी दहा वर्षात जे काम केलं, ते लोकांपर्यंत पोहोचलं. लोकांनी विकासाला मत दिलं आहे. त्यामुळे त्यांचाही मोठा विजय झाला आहे. त्यामुळं मी सर्वांचं अभिनंदन करतो. तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचंही अभिनंदन करतो. कारण मोदी आता तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनणार आहेत. मोदींचं सरकार स्थापन होण्यासाठी आम्ही महायुतीत त्यांना लवकरच पाठिंबा जाहीर करू. काही लोकांचा मोदींचा पराभव करण्याचा उद्देश होता. मोदी देशाचा विकास करण्याचा अजेंडा घेऊन निवडणूक लढत होते. पण विरोधकांना मोदींना हरवायचं आहे. मोदींना तडीपार करण्याचा विचार जे करत होते. या देशातील जनतेनं त्यांना उत्तर दिलं आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

शिंदे माध्यमांशी संवाद साधताना पुढे म्हणाले, महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना मी धन्यवाद देतो. खूप मेहनत घेतल्यानंतर इतकं मोठं मताधिक्य मिळालं आहे. ठाणे लोकसभा शिवसेनेचा गड आहे. आनंद दिघे यांचा गड आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या या ठाणे लोकसभेवर प्रभाव आहे. विजय तर निश्चितच होता. लोकांनीही आशीर्वाद दिला आहे. त्यामुळे आमचे कार्यकर्ते नरेश म्हस्के विजयी झाले आहेत. लोकांनी दाखवलेल्या विश्वासाला आम्ही पात्र राहू. ठाणे लोकसभा मतदारसंघाचा विकास करू. या मतदारसंघातील कामे निश्चितपणे केली जातील. डॉ. श्रीकांत शिंदे यांनाही कल्याणमध्ये मोठा विजय मिळाला आहे. त्यांनाही मोठं मताधिक्य मिळालं आहे. त्यांचंही मी अभिनंदन करतो. कल्याण लोकसभेच्या मतदारांचं आभार मानतो. महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो.

मोठी बातमी ! वाराणसी मतदारसंघातून नरेंद्र मोदी विजयी, राहुल गांधी रायबरेलीतून ४ लाख मतांनी विजयी, अमेठीतून भाजपच्या स्मृती इराणींचा पराभव

काँग्रेस नेते राहुल गांधी रायबरेली मतदारसंघातून ४ लाख मतांनी विजयी झाले आहेत. संपूर्ण देशभरात भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून भाजप सरकारला धारेवर धरणाऱ्या राहुल गांधींना जनतेनं कौल दिला आहे. तसच या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींच्या नेतृत्वात उतरलेल्या इंडिया आघाडीनं भाजपच्या महायुतीला काँटे की टक्कर दिली आहे.

ठाण्यात शिंदेंचा गड राखला, शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के विजयी, ठाकरे गटाच्या राजन विचारेंचा झाला पराभव

बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळेंनी उधळला विजयाचा गुलाल, सुनेत्रा पवारांचा पराभव

राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे विजयी झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. राष्ट्रवादी पक्षाच्या बारामतीत असलेल्या अस्तित्वाच्या लढाईत अखेर सुप्रिया सुळेंनी बाजी मारली. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे सलग चौथ्यांदा विजयी झाल्या आहेत.

मोठी बातमी ! अमरावती मतदारसंघात भाजप उमेदवार नवनीत राणांचा पराभव, काँग्रेसचे बळवंत वानखेडे झाले विजयी

Breaking : १) पालघरमध्ये भाजपचा पहिला विजय; हेमंत सावरा विजयी

पालघरमध्ये भाजपचे हेमंत सावरा विजयी झाले असून शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार भारती कामडी यांचा पराभव झाला आहे.

२) मुंबईत भाजपनं विजयाचं खातं उघडलं, पीयूष गोयल विजयी

उत्तर मुंबईत भाजपचे पीयूष गोयल विजयी झाले आहेत. काँग्रेसच्या भूषण पाटील यांचा पराभव झाला आहे.

३) नंदूरबारमध्ये काँग्रेसचे गोवाल पाडवी विजयी झाले आहेत. भाजपच्या हिना गावित यांचा पराभव झाला आहे.

४) दक्षिण मुंबई मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत विजयी, शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांचा पराभव

५) दक्षिण मध्य मुंबईतून शिवसेनेचे अनिल देसाई विजयी, शिंदे गटाचे राहुल शेवाळे यांचा पराभव झाला आहे.

६) चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर विजयी झाल्या. भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव झाला. सुधीर मुनगंटीवार यांचा सव्वा लाख मतांच्या फरकानं पराभव झाला आहे.

७) हिमाचलमधून भाजप उमेदवार कंगना राणावत विजयी झाल्या आहेत.

८) रायगडमधून महायुतीचे उमेदवरा सुनील तटकरे विजयी झाले. तर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गीते यांचा पराभव झाला आहे.

९) वर्ध्यात भाजप उमेदवार रामदास तडस यांचा पराभव, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अमर काळे विजयी झाले.

१०) दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात अनिल देसाई विजयी झाले. शिंदे गटाचे राहुल शेवाळे यांचा पराभव झाला आहे.

११) लातूरमध्ये शिवाजीराव काळगे विजयी झाले आहेत. तर भाजपचे सुधाकर श्रुंगारे यांचा पराभव झाला आहे.

१२) मावळमध्ये शिवसेनेचे श्रीरंग बारणे विजयी झाले, तर ठाकरे गटाचे संजोग वाघेरे पराभूत झाले आहेत.

१३) मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात अमोल किर्तीकर विजयी झाले. रवींद्र वायकर यांचा पराभव झाला आहे.

१४) कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराज विजयी झाले असून संजय मंडलिक यांचा पराभव झाला आहे.

१५) पुण्यात भाजपचे मुरलीधर मोहोळ विजयी झाले आहेत, तर मविआचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा पराभव झाला आहे.

१६) शिरुर मतदारसंघात अमोल कोल्हे विजयी झाले असून शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव झाला आहे.

१७) उत्तर मध्य मुंबईत वर्षा गायकवाड विजयी झाल्या असून भाजपचे उमेदवार ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांचा पराभव झाला आहे.

संजय राऊत पत्रकार परिषदेत काय म्हणाले?

महाराष्ट्राने मोदींना रोखलं आहे. मोदींनी राजीनामा द्यावा. देशाच्या जनतेनं मोदींनी नाकारलं आहे. देशात परिवर्तन होत आहे. सकारात्मक गोष्टी घडत आहेत. भाजपने २०१४ आणि २०१९ मध्ये पूर्ण बहुमत मिळवलं होतं. पण २०२४ मध्ये भाजपला बहुमत मिळालं नाही. हा नरेंद्र मोदी आणि अमित शहांचा पराभव आहे. मोदी आणि शहांचा अहंकार संपवून टाकला आहे. मोदींचं सरकार स्थापन होणार नाही. मोदींनी सर्वात आधी राजीनामा द्यावा. तोडफोड करून सरकार बनवाल, तर जनता तुम्हाला रस्त्यावर आणेल. मोदींचं नाक कापलं आहे.

शरद पवार पत्रकार परिषदेत काय म्हणाले?

या लोकसभा निवडणुकीत अनेक चांगल्या गोष्टी घडल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मर्यादित जागा लढवल्या. सर्व मिळून आम्ही दहा जागा लढवल्या. अजून मतमोजणी झाली नाही. पण सात जागांवर आम्ही आघाडीवर आहोत. हे यश पक्षाचं मानत नाही. महाविकास आघाडी, विशेषत: काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरेंची शिवसेना यांनी एकत्रित जीवाभावाच्या वतीनं काम करण्याची भूमिका घेतली. आम्हाला जसं यश मिळालं, तसं काँग्रेसला सुद्धा मिळालं. आजचा निकाल विधानसभेसाठी प्रेरणादायी आहे. आम्हाला उत्तर प्रदेशात चांगलं यश मिळालं. मध्य प्रदेशमध्ये अजून काम करायचं आहे. बारामतीचा मतदार योग्य भूमिका घेईल, याची खात्री होती. भाजपच्या पक्षफोडीच्या राजकारणाला जनतेनं धडा शिकवला, असं म्हणत शरद पवार यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.

शरद पवार पत्रकार परिषदेत पुढे म्हणाले, महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी जे कष्ट घेतले, त्याबद्दल संघटनेच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो. हा निकाल परिवर्तनाला पोषक आहे. राज्यात एकप्रकारे परिवर्तनाची प्रकिया सुर झाली आहे. सुदैवाने देशपातळीवरील चित्र अतिशय आशादायक आहे. उत्तर प्रदेशमध्ये वेगळा निकाल येथील जनतेनं दिला आहे.

या निकालाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे की, भाजपला या भागात जे यश मिळायचं, त्याचं मार्जिन फार मोठं असायचं. त्यांना आता मर्यादित अशा मार्जिनने जागा मिळाल्या आहेत. याचा अर्थ राष्ट्रीय पातळीवर आम्ही जे काम केलं, त्यामुळे देशात अनुकुल परिस्थिती निर्माण झाली आहे. एक्झिट पोलच्या अंदाजाच्या विरोधात हा निकाल लागला आहे. मी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, मार्क्सवादी आणि अन्य नेत्यांसोबत चर्चा केली.

मोठी बातमी : जेडीएसचे प्रज्वल रेवण्णा पराभूत

कर्नाटकच्या हासन मतदारसंघात जेडीएसचे प्रज्वल रेवण्णा ४४००० मतांनी पराभूत झाल्याची माहिती समोर आली आहे. रेवण्णांवर महिलांचे शोषण केल्याचे आरोप लावण्यात आले होते. काँग्रेसचे व्यंकट रमण गौडा यांचा विजय झाला आहे.

राहुल गांधी दोन्ही जागांवर आघाडीवर

राहुल गांधी दोन्ही जागांवर आघाडीवर आहे. रायबरेलीत १ लाखांनी तर वायनाडमधून २ लाख मतांनी आघाडीवर आहेत.

१) सांगलीचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील ५५३१६ मतांनी आघाडीवर आहेत. भाजपचे संजयकाका पाटील आणि महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील पिछाडीवर आहेत.

२) रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजप उमेदवार नारायण राणे २६,९३४ मतांनी आघाडीवर आहेत.

३) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार बाळ्यामामा म्हात्रे २५६१९ मतांनी आघाडीवर आहे.

४) अमरावतीत नवनीत राणांना फक्त ७०० मतांची आघाडी मिळाली आहे.

५) दक्षिण मध्य मुंबईत अनिल देसाई ३२५९२ मतांनी पुढे आहेत.

६) अकोल्यात अभय पाटील १६ हजार मतांनी आघाडीवर आहेत.

७ ) ठाण्याचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के १ लाख ९ हजार मतांनी आघाडीवर आहेत.

८) जालन्यात काँग्रेसचे कल्याण काळे ५०७१ मतांनी आघाडीवर आहेत. भाजपचे रावसाहेब दानवे पिछाडीवर आहेत.

९) ईशान्य मुंबईत संजय दिना पाटील २८२७२ मतांनी आघाडीवर आहेत.

१०) बुलढाण्यात महायुतीचे प्रतापराव जाधव १५९६८ मतांनी आघाडीवर आहेत.

११) शिवसेनेचे ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत ५९ हजार मतांनी आघाडीवर आहेत.

१२) माढा लोकसभेत महाविकास आघाडीचे धेर्यशील मोहिते पाटील ३८ हजार १५२ मतांनी आघाडीवर आहेत.

१३) यवतमाळ मतदारसंघात संजय देशमुख ५३ हजार मतांनी आघाडीवर आहेत.

१४) शिर्डीत महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे ३६ हजार मतांनी आघाडीवर आहेत.

१६) कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे ३ लाख ४६ हजार ९६० मतांनी आघाडीवर आहे.

१७) अमरावतीत भाजपच्या नवनीत राणा पिछाडीवर

नरेश म्हस्के काय म्हणाले?

ठाणे आणि एकनाथ शिंदे हे एक समीकरण आहे. ते कुणी बदलू शकत नाही. समोर जी आकडेवारी येत आहे. ती विजयाच्या दिशेनं वाटचाल करीत आहे.

बारामती लोकसभा मतदार संघ

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे २५००० हजार मतांनी आघाडीवर असून एनसीपीच्या अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार पिछाडीवर आहेत. दोन्ही उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर सुरु आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघ

महायुतीचे उमेदवार नारायण राणे १८ हजार मतांनी आघाडीवर आहेत. तर महाविकास आघाडीचे विनायक राऊत पिछाडीवर आहेत.

सोलापूर मतदार संघ

इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे पिछाडीवर आहेत. राम सातपुते ७७८५ मतांनी आघाडीवर आहेत.

ठाणे लोकसभा मतदार संघ

ठाण्यात महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे नरेश म्हस्के ६२००० मतांनी आघाडीवर असून मविआचे उमेदवार राजन विचारे पिछाडीवर आहेत.

वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी १७००० मतांनी आघाडीवर, निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार मोदी आघाडीवर आहेत.

रायगड लोकसभा मतदारसंघ

रायगड लोकसभा मतदारसंघातून मविआचे उमेदवार अनंत गिते पिछाडीवर असून महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे ३५००० मतांनी आघाडीवर आहेत.

भिवंडी लोकसभा मतदारसंघ

भिवंडी लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार कपील पाटील पिछाडीवर आहेत. बाळ्यामामा म्हात्रे ६९४१ मतांनी आघाडीवर आहेत.

सांगली लोकसभा मतदारसंघ

विशाल पाटील ३९००० मतांनी आघाडीवर आहेत.

भंडारा-गोंदीया लोकसभा मतदार संघ

सुनील मेंढे ६८२३ मतांनी आघाडीवर आहेत.

धाराशिव लोकसभा मतदारसंघ

धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर ७७९०७ मतांनी आघाडीवर आहेत.

शिरुर लोकसभा मतदारसंघ

अमोल कोल्हे ४४००० मतांनी आघाडीवर आहेत.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघ

मविआचे उमेदवार निलेश लंके ५००० मतांनी आघाडीवर आहेत.

कल्याण लोकसभा मतदारसंघ

कल्याणमध्ये शिंदे गटाचे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे ८५००० मतांनी आघाडीवर आहेत.

मुंबई उत्तर मध्य मतदारसंघ

महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम १५००० मतांनी आघाडीवर आहेत.

रावेर लोकसभा मतदारसंघ

रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे ४५ हजार मतांनी आघाडीवर आहेत.

मावळ लोकसभा मतदारसंघ

मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे २८ हजार मतांनी आघाडीवर आहेत.

यवतमाळ लोकसभा मतदारसंघ

यवतमाळमधून ठाकरे गटाचे संजय देशमुख ३१४३१ मतांनी आघाडीवर आहेत.

नागपूर लोकसभा मतदारसंघ

नागपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार नितीन गडकरी ४१००० मतांनी आघाडीवर आहेत.

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ

या मतदार संघाजून संजय दिना पाटील ८००० मतांनी आघाडीवर आहेत.

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ

महायुतीचे उमेदवार अरविंद सावंत ३३०९० हजार मतांनी आघाडीवर आहेत. यामिनी जाधव पिछाडीवर आहेत.

वायनाडमधून राहुल गांधी ६५००० मतांनी आघाडीवर

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ

प्रतिभा धानोरकर २७००० मतांनी आघाडीवर आहेत. सुधीर मुनगंटीवर १० हजार मतांनी पिछाडीवर आहेत.

अमरावती लोकसभा मतदारसंघ

काँग्रेस उमेदवार बळवंत वानखेडे पिछाडीवर आहेत. नवनीत राणा १५०० मतांनी आघाडीवर आहेत.

बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे ७९२७ मतांनी आघाडीवर

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ

अनिल देसाई २९००० मतांनी आघाडीवर आहेत.

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ

पियुष गोयल ८२००० मतांनी आघाडीवर आहेत.

मंडी लोकसभा मतदारसंघातून कंगना राणावत २२००० मतांनी आघाडीवर आहे.

पुणे लोकसभा मतदार संघ

भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ ३५ हजार मतांनी आघाडीवर आहेत.

नाशिक लोकसभा मतदारसंघ

राजाभाऊ वाजे ४४००० मतांनी आघाडीवर आहेत.

काँग्रेसने १५० जागांपर्यंत पोहोचणं म्हणजे नरेंद्र मोदींचा निरोप समारंभ पूर्ण झाला - संजय राऊत

काँग्रेसने १५० जागांपर्यंत पोहोचणं म्हणजे नरेंद्र मोदींचा निरोप समारंभ पूर्ण झाला. महाविकास आघाडी महाराष्ट्रात पुढे राहील. देशभरात इंडिया आघाडी २९५ जागांपेक्षा जास्त जागा जिंकेल. कोणत्याही परिस्थितीत एनडीएला बहुमत मिळणार नाही, असं मला वाटतं. पूर्ण निकाल आल्यानंतर सर्वकाही समोर येईल.

पुण्यातील कसबा येथील मतमोजणीवर काँग्रेसने घेतला आक्षेप

उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाची सायकल सुसाट, भाजपला मोठा धक्का

उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाने ८० जागांवर आघाडी घेतली आहे. उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसल्याची माहिती समोर आलीय.

शेअर बाजार ३९९७ अंकांनी घसरला, शेअर बाजार गडगडला

नंदूरबार लोकसभा मतदारसंघ

गोवाल पाडवी १०५००० मतांनी आघाडीवर आहेत.

जळगाव लोकसभा मतदारसंघ

स्मिता वाघ ७४ हजार मतांनी आघाडीवर आहेत.

पुणे लोकसभा मतदारसंघ

मुरलीधर मोहोळ ३७ हजारांनी आघाडीवर आहेत.

बुलढाणा लोकसभा मतदारसंघ

महायुतीचे प्रतापराव जाधव ११९१० मतांनी आघाडीवर आहेत.

अमोल कोल्हे -

"मतदान होण्याआधी प्रचाराला गेलो होतो. अनेकांनी विचारलं होतं की, एव्हढा आत्मविश्वास कसा आहे, प्रामाणिकपणे काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आणि शिरुर लोकसभेच्या मायबाप मतदारांचा हा आत्मविश्वास आहे. तेच चित्र आज पाहायला मिळत आहे, याचं आज समाधान आहे. संघर्ष जेव्हढा मोठा होतो, विजय तितकाच शानदार असतो. इतक्या मोठ्या नेत्यांना आव्हान दिल्यावर अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. शरद पवार साहेब हे आमच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले. सर्वसामान्य कार्यकर्त्याने शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या प्रेमापोटी आणि विश्वासाप्रती जिगरीनं लढवलेली ही निवडणूक आहे."

संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ

शिवसेनेचे संदिपान भुमरे ४८५५ मतांनी आघाडीवर आहेत.

बुलढाणा लोकसभा मतदारसंघ

महायुतीचे प्रतापराव जाधव १३११० मतांनी आघाडीवर आहेत.

दक्षिण मुंबई मतदारसंघ

शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत ३५ हजार मतांनी आघाडीवर आहेत.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघ

सुजय विखे पाटील ९६६२ मतांनी आघाडीवर आहेत.

वर्धा लोकसभा मतदारसंघ

अमर काळे २४ हजार मतांनी आघाडीवर आहेत.

यवतमाळ लोकसभा मतदारसंघ

संजय देशमुख ३७८९४ मतांनी आघाडीवर आहेत.

दक्षिण मुंबई मतदारसंघ

शिवसेनेचे अरविंद सावंत २२३५७ मतांनी पुढे आहेत.

बीड लोकसभा मतदारसंघ

पंकजा मुंडे ९३६६ मतांनी आघाडीवर आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघ

श्रीरंग बारणे ४३,०४९ मतांनी आघाडीवर आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघ

श्रीकांत शिंदे ९६६२९ मतांनी आघाडीवर आहे.

धुळे लोकसभा मतदारसंघ

सुभाष भामरे १६३३९ मतांनी पुढे आहेत.

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ

सुनील मेंढे २४६४ मतांनी आघाडीवर आहेत.

१) बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे ३१६६१ मतांनी आघाडीवर आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com