नंदुरबार शहरातील नाल्यात आढळल्या 2 हजारांच्या नकली नोटा

नंदुरबार शहरातील नाल्यात आढळल्या 2 हजारांच्या नकली नोटा

नकली नोटा पाहण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी

प्रशांत जव्हेरी | नंदुरबार : नंदुरबार शहरात एका नाल्यात दोन हजारांच्या नकली नोटा आढळून आल्या आहेत. या नकली नोटांना पाहण्यासाठी नागरिकांनी तोबा गर्दी केली आहे. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत नोटा ताब्यात घेतल्या आहेत. दरम्यान, नकली नोटा संदर्भात पोलिसांमार्फत अजूनही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

नंदुरबार शहरातील नाल्यात आढळल्या 2 हजारांच्या नकली नोटा
रिफायनरी विरोधक राष्ट्रवादीच्या दरबारी! शरद पवारांनी थेट लावला मुख्यमंत्र्यांना फोन, काय झाली चर्चा?

नंदुरबार शहरातील धुळे चौफुली परिसरात असलेल्या एका नाल्यात दोन हजारांच्या चक्क 15 ते 20 नकली नोटा आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. नकली नोटा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात धुळे चौफुली परिसरात मोठी गर्दी केली होती. मात्र, खऱ्या दिसणाऱ्या या दोन हजारांच्या नोटा या ठिकाणी टाकल्या कोणी हे अद्यापही स्पष्ट झालं नसलं तरी नंदुरबार पोलिसांनी या नोटा ताब्यात घेतल्या आहेत. यासंबधी पोलिसांमार्फत अधिकृत अशी कोणतीही माहिती अद्यापही देण्यात आलेली नाही. नकली नोटा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली असल्यामुळे काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com