मुस्लिम युवकांनी केले 923 हिंदूंवर अंत्यसंस्कार

मुस्लिम युवकांनी केले 923 हिंदूंवर अंत्यसंस्कार

Published by :

अंतिम यात्रा म्हटलं तर प्रत्येक कुटुंबियांसाठी भावनिक क्षण असतो. मात्र हा क्षण कोरोनामुळे प्रत्येकाचाच हिरावला आहे. अशात स्मशानभूमीत अग्नी देणारा व्यक्ती कोरोना योद्धा म्हणून समोर येत आहे. अशाच यवतमाळच्या एका मुस्लिम युवकाने तब्बल 923 कोरोना मृतदेहांवर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले आहेत. त्यामुळे मोक्षधामातही भारतीय एकात्मता दिसून येत असल्याचे बोलले जात आहे.

कोरोनामुळे रक्ताचे नातेवाईक सुद्धा मृतदेहाला स्पर्श करायला धजावत नाहीत. अशा परिस्थितीत नगर पालिका नियुक्त ४ कर्मचारी अॅम्ब्युलन्समधून मृतदेह उतरवितात. तर धर्माने मुस्लिम असलेले अब्दुल जब्बार आणि शेख अहमद हे दोघेही हिंदू विधिनुसार मृतदेहावर अंत्यसंस्कार करतात.गेल्या वर्षांपासून कोरोना काळात झालेल्या 923 मृतदेहांवर त्यांनी हिंदू धर्माच्या विधीनुसार अंत्यसंस्कार केले आहेत. कोरोना सारख्या महामारीत परिवार, कुटुंब, धर्म आणि समाज बाजूला ठेवून माणुसकीसाठी लढणाऱ्या या कोरोना योद्ध्यांच्या माणुसकीला लोकशाहीचा सलाम.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com