सांगली : साधूंच्या मारहाणी प्रकरणी अखेर गुन्हा दाखल, सहा जणांना अटक

सांगली : साधूंच्या मारहाणी प्रकरणी अखेर गुन्हा दाखल, सहा जणांना अटक

उत्तर प्रदेश येथील चौघा साधूंना झालेल्या मारहाणीची पोलिसांनी गंभीर घेतली दखल

संजय देसाई | सांगली : उत्तर प्रदेश येथील चौघा साधूंना झालेल्या मारहाणीची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत 6 जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली आहे.

जत तालुक्यातल्या लवंगा या ठिकाणी उत्तर प्रदेश येथील चार साधूंना जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. कर्नाटकमधून पंढरपूरकडे देवदर्शनासाठी जात होते. यादरम्यान लवंगा या ठिकाणी रस्ता विचारण्यासाठी थांबलेल्या साधूंना चोर समजून जमावाने हे बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला होता.

मात्र, साधूंनी गैरसमजातून हा प्रकार घडल्याचा स्पष्ट करत कोणतीही तक्रार न देता पंढरपूरकडे निघून गेले होते. मात्र, या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावरून चांगलाच व्हायरल झाल्यानंतर सांगली पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली. व उमदी पोलीस ठाण्यामध्ये साधूंच्या मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आल्याची माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली आहे. आणखी संशयितांचा शोध सुरू असून केवळ गैरसमजूतीतून हा सर्व प्रकार घडल्याचं पोलीस अधीक्षक गेडाम यांनी स्पष्ट केलं आहे.

Lokshahi
www.lokshahi.com