विवाहित प्रेयसीने सोबत येण्यास दिला नकार; प्रियकराने केले चिमुरड्याचे अपहरण

विवाहित प्रेयसीने सोबत येण्यास दिला नकार; प्रियकराने केले चिमुरड्याचे अपहरण

पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपीस अवघ्या 12 तासात ताब्यात घेत अटक केली आहे.

भिवंडी : विवाहित प्रेयसी सोबत येत नसल्याच्या रागातून आरोपीने तिच्या अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलीस स्थानकात तक्रार नोंदविली असता घटनेचे गांभीर्य ओळखत पोलिसांनी मोठ्या शिताफीने अवघ्या 12 तासात आरोपीस ताब्यात घेत अटक केली आहे. रिपोन व्यापारी असे त्या आरोपीचे नाव आहे.

विवाहित प्रेयसीने सोबत येण्यास दिला नकार; प्रियकराने केले चिमुरड्याचे अपहरण
त्रिवेदीला पहिल्या रांगेत बसवत महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळलं; रोहित पवारांचे भाजपवर टीकास्त्र

माहितीनुसार, मोहम्मद अली फकीर व त्याची पत्नी आयशा बीबी आपल्या चार वर्षीय आशिक अली या मुलासह टेमघर येथील चाळीत राहतात. 3 एप्रिल रोजी सायंकाळी त्यांचा मुलगा घराबाहेर आढळून आला नाही. तसेच, शोधाशोध करुनही न सापडल्याने आयशा बीबी यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दिली. पोलिसांनी गांभीर्य ओळखून अपहरणाचा गुन्हा दाखल केला. त्याच दरम्यान मुलाच्या आईचा पाच वर्षांपासून प्रियकर असलेल्या रिपोन व्यापारी याने मोबाईलवर फोन करीत तुझा मुलगा माझ्या जवळ असून तू माझ्या सोबत राहायला ये, असे सांगितले. अस न केल्यास मुलाचे बरेवाईट करण्याची धमकी दिली. आरोपीने मुलाच्या आईस नाशिक येथे येण्यास सांगितले.

ही माहिती पोलिसांना मिळताच शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मुक्ता फडतरे व पोलीस पथकाने तातडीने पावले उचलत दोन पथक बनवून आरोपीस पकडण्यासाठी कारवाई सुरू केली. तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा माग काढण्यासाठी मुलाच्या आईसोबत सहाय्यक पोलीस निरीक्षक मुक्ता फडतरे या स्वतः रेल्वेने नाशिक येथे पोहचल्या. तेथील रेल्वे स्टेशनच्या ब्रिजवर आरोपी रिपोन व्यापारी उभा असल्याचे आढळून आले. यानंतर महिला पोलीस अधिकारी मुक्ता फडतरे यांनी त्याच्या शिताफीने मुसक्या आवळल्या. व चिमुरड्याची सुटका करत पालकांच्या स्वाधीन केले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com