Crime
CrimeTeam Lokshahi

धक्कादायक! हुंड्यासाठी नवऱ्यानेच बनवला बायकोच्या आंघोळीचा व्हिडिओ

नागपूरमधील ही घटना घडल्याचे समजत आहे. याप्रकरणी पीडित महिलेने पतीविरोधात मानकापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला आहे.

कल्पना नलसकर | नागपूर : हुंड्यासाठी चक्क आंघोळीची व्हिडिओ क्लिपिंग बनवून बायकोला ब्लॅकमेल केल्याची घटना समोर येत आहे. नागपूरमधील ही घटना घडल्याचे समजत आहे. याप्रकरणी पीडित महिलेने पतीविरोधात मानकापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला आहे. अमित अग्रवाल असे आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे पतीच्या या कृष्ण कृत्याला त्याच्या आई वडिलांचा देखील पाठिंबा असल्याची माहिती आहे.

Crime
चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून उध्दव ठाकरेंचा राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न; शिंदेंची टीका

पैशांची हव्यास माणसाला कुठल्या स्तरावर नेईल याचं हे उत्तम उदाहरण आहे. आरोपी पती आणि पत्नीचे हे दुसरे लग्न असून नवऱ्याला व्यवसायासाठी पैसे हवे होते. लग्नावेळी 4 लाख रुपयांचे दागिने दिले होते. मात्र, आरोपी अमित अग्रवाल त्यावर समाधानी नव्हता. त्याने पत्नीसोबत वेगळे राहत असताना पत्नीचा आंघोळ करताना व्हिडिओ क्लिपिंग बनविली. माहेरून पैसे न आणल्यास ही क्लिपिंग सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊ लागला. आरोपीच्या त्रासाने पीडितेचा दोन वेळा गर्भपात देखील झाला होता. त्रास असह्य झाल्याने पीडितेने मानकापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com