Vishrantwadi Crime | Pune Crime | Pune Police
Vishrantwadi Crime | Pune Crime | Pune PoliceTeam Lokshahi

अमरावतीत उदयपूरप्रमाणे गळा चिरुन हत्या, भाजपने केला मोठा आरोप

अमरावती शहरात 21 जूनच्या रात्री मेडिकल व्यवसायिक उमेश कोल्हे (वय५१वर्ष) यांची हत्या झाली होती. या हत्येचे तार मात्र वादग्रस्त नुपूर शर्मा यांच्या प्रकरणाशी जोडले जात आहे.
Published by :
Team Lokshahi

अमरावती शहरात 21 जूनच्या रात्री मेडिकल व्यवसायिक उमेश कोल्हे (वय५१वर्ष) यांची हत्या झाली होती. या हत्येचे तार मात्र वादग्रस्त नुपूर शर्मा यांच्या प्रकरणाशी जोडले जात आहे. कोल्हे यांनी नुपूरच्या समर्थनार्थ फेसबुक पोस्ट शेअर केल्याने व तसेच स्टेटस ठेवल्याने त्यांची हत्या झाल्याचा दावा भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आला.

अमरावती येथील अमित मेडिकलचे संचालक उमेश कोल्हे त्यांची 21 जून रोजी रात्री 10 वाजता हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी पाच आरोपींना अटक सुद्धा केली. मात्र पोलीस या प्रकरणात सहावा आरोपी अटक व्हायचा असल्याने हत्ये मागचं कारण सांगायला तयार नाही. उमेश कोल्हे यांची हत्या त्यांनी नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट टाकल्यानेच झाली असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे खासदार अनिल बोंडे यांनी केला आहे. पोलिसांनी त्या दिशेने तपास करून यातील सत्य उघड आणावं अशी मागणी आज पोलिस आयुक्त आरती सिंग यांना भेटून केलेली आहे. मात्र या प्रकरणी अमरावती पोलीस आयुक्तालयातील कोणताही  पोलीस अधिकारी या प्रकरणात माध्यमांना प्रतिक्रीया देण्यास सपशेल नकार देत आहे.

गळा चिरुन हत्या

राजस्थानातील हत्येप्रमाणेच अमरावती शहरात देखील  केवळ गळा चिरून ही हत्या करण्यात आली. कोल्हे यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आरोपींनी पोलिसांना ही हत्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकल्यामुळेच केली असल्याची माहिती पोलिसांकडूनच आम्हाला मिळाली अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे नेते तुषार भारतीय यांनी दिली. पोलीस हे प्रकरण कुठेतरी दडपण्याचा प्रयत्न करत असल्याने या प्रकरणाचा तपास एटीएस मार्फत करावा अशी मागणी भाजप नेते तुषार भारतीय यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली आहे. शहरातील नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट टाकल्याने आठ ते दहा लोकांना धमक्या आल्या, अशी माहिती भाजप नेते तुषार भारतीय यांनी दिली, त्यामुळे पोलिसांनी यावर वेळीच पायबंद घालावा अशी मागणी तुषार भारतीय यांनी केली आहे.

यांना केली अटक

अब्दुल तौफिक उर्फ नानू शेख तसलिम (24)

शोएब खान उर्फ भुऱ्या वल्द साबीर खान (22)

मुदस्सीर अहमद शेख इब्राहिम (22)

शाहरुख पठाण हिदायत खान (24)

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com