कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय… ४५ हजार विद्यार्थ्यांना होणार लाभ

कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय… ४५ हजार विद्यार्थ्यांना होणार लाभ

Published by :

कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील अकृषी विद्यापीठाच्या धर्तीवर चारही कृषी विद्यापीठांनी शासकीय व खासगी कृषी महाविद्यालयातील पदवी, पदव्युत्तर आणि आचार्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शुल्क सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. कृषीमंत्री दादा भुसे यांनी संबंधित निर्णय जाहीर केलाय.

त्यामुळे राज्यातील ३८ शासकीय, १५१ विनाअनुदानित अशा एकूण १८९ महाविद्यालयातील ४५ हजार विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्याचे आई-वडील, पालक यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असेल, अशा विद्यार्थ्यांचे सुरू असलेले पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होईपर्यंतच्या संपूर्ण शुल्कात सुट देण्याचा निर्णयही कृषीमंत्र्यांनी घेतला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com