विधी अभ्यासक्रमाचा पेपर व्हॉट्‌स अ‍ॅपवर लीक; भाजपच्या माजी नगरसेवकाने फोडला पेपर

विधी अभ्यासक्रमाचा पेपर व्हॉट्‌स अ‍ॅपवर लीक; भाजपच्या माजी नगरसेवकाने फोडला पेपर

भाजपचे माजी नगरसेवकास गाडगेनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सूरज दहाट | अमरावती : येथील शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेत उन्हाळी २०२३ परीक्षेत पेपर फुटीचा पेपर घडला आहे. विधी अभ्यासक्रमाच्या लॉ ट्रस्ट विषयाचा पेपर शनिवारी मोबाईलद्वारे व्हॉट्‌स अ‍ॅपवर लीक करण्यात आला. याप्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक प्रणित सोनी, भूषण किसन हरकुट, किशोर पिंपळकर या तिघांना गाडगेनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर प्रणित सोनी यांनीच हा पेपर फोडल्याची धक्कादायक बाब तपासात पुढे आली आहे

विधी अभ्यासक्रमाचा पेपर व्हॉट्‌स अ‍ॅपवर लीक; भाजपच्या माजी नगरसेवकाने फोडला पेपर
फडणवीसांच्या भेटीवर आशिष देशमुखांची प्रतिक्रिया; कालचे विरोधक, आज मित्र....

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेत शनिवारी सकाळी ९ ते १२ या दरम्यान विधी अभ्यासक्रमाच्या लॉ ट्रस्ट विषयाचा चौथ्या सेमिस्टरचा पेपर होता. मात्र, पेपर सुरु होण्यापूर्वीच तो मोबाईलवर लीक झाला. व्हॉट्‌स अ‍ॅपवर हा पेपर लीक झाल्याचे समजत आहे. याप्रकरणी प्रणित सोनी, भूषण किसन हरकुट, किशोर पिंपळकर या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या विषयाच्या झेरॉक्स या तिघांकडे आढळल्याचे बोलले जात आहे. पोलिस याप्रकरणी तपास करीत असून गुन्हा दाखल व्हायचा आहे.

लॉ ट्रस्टचा पेपर लीक झाल्याची माहिती मिळताच अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यांकन मंडळाच्या संचालक मोनाली तोटे यांनी घटनास्थळी धाव घेत झालेल्या प्रकाराची माहिती जाणून घेतली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com