धक्कादायक! सावकारांच्या जाचाला कंटाळून पुण्यात एका अधिकाऱ्याची आत्महत्या

धक्कादायक! सावकारांच्या जाचाला कंटाळून पुण्यात एका अधिकाऱ्याची आत्महत्या

पुणे येथील घटना; पोलिस स्थानकात गुन्हा दाखल

चंद्रशेखर भांगे | पुणे : सावकारांच्या जाचाला कंटाळून सहकार विभागातील अधिकाऱ्याने आत्महत्या केली आहे. पुणे येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. गणेश शंकर शिंदे (वय 52) असे आत्महत्या केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे.

गणेश शिंदे हे सहकार विभागात मुंबईतील कार्यालयात लेखाधिकारी असून त्यांना मुंबईहून पुण्याला बदली पाहिजे होती. यासाठी अधिकाऱ्यांना पैसे देण्यासाठी शिंदे यानी विविध सावकारांकडून लाखो रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्जाचे पैसे सावकारांना शिंदे यांनी दिले असताना सुद्धा सावकारांनी त्यांच्यामागे वारंवार पैशांसाठी तगादा लावला जात होता. सावकारांच्या जाचाला कंटाळून अखेर गणेश शिंदे यांनी आत्महत्या केली.

याप्रकरणी पुण्यातील फरसखाना पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात शंकर लक्ष्मण गायकवाड, विजय सोनी, बाळकृष्ण क्षीरसागर, गणेश साळुंखे, मनीषा हजारे आणि एका अनोळखी इसमावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी यांनी गणेश शिंदे यांना लाखो रुपयांची कर्ज 20 ते 30 रुपये टक्क्यांने दिले असल्याते समजत आहे.

Lokshahi
www.lokshahi.com