Crime
CrimeTeam Lokshahi

ऑडी चालवणाऱ्या लोकांना पत्ता विचारता का, म्हणत वकिलाला बेदम मारहाण

पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका वकिलाला आलिशान कारमध्ये बसलेल्या व्यक्तीला पत्ता विचारणे चांगलेच महागात पडले.

अमोल धर्माधिकारी | पुणे : पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. जंगली महाराज रस्त्यावर एका वकिलाला आलिशान कारमध्ये बसलेल्या व्यक्तीला पत्ता विचारणे चांगलेच महागात पडले. ऑडीमध्ये बसलेल्या व्यक्तीने ऑडी चालवणाऱ्या लोकांना पत्ता विचारता का असे म्हणून त्यांना मारहाण केली. जंगली महाराज रस्त्यावरील सुभद्रा हॉटेलच्या समोर हा सर्व प्रकार घडला. याप्रकरणी विशाल शंकर सोनवणे यांनी तक्रार दिली आहे.

Crime
एक रुपयाही न देता मिळणार तांदूळ, सरकारचा मोठा निर्णय

फिर्यादी यांनी डेक्कन परिसरातील सुभद्रा हॉटेल समोर थांबलेल्या एका ऑडीतील व्यक्तीला ज्ञानमुद्रा टिटोरियल क्लासचा पत्ता विचारला होता. याचा राग मनात धरून ऑडी चालकाने "तुम्हाला समजते का, तुम्ही कोणाला पत्ता विचारत आहात, आम्ही ऑडी चालवणारे लोक आहोत", असे म्हणून फिर्यादीला शिवीगाळ केली व हाताने मारहाण केली. त्यानंतर कार वेगाने घेऊन जात असताना गाडीचे चाक फिर्यादीच्या पायावरून गेले. यामध्ये फिर्यादी जखमी झाले आहेत. दरम्यान, कार चालकाविरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com