Bageshwar Baba | Sant Tukaram Maharaj
Bageshwar Baba | Sant Tukaram MaharajTeam Lokshahi

बागेश्वर बाबांचे संत तुकाराम महाराजांबद्दल वादग्रस्त विधान; म्हणाले, पत्नी रोज मारहाण...

मारहाण करणारी पत्नी मिळाल्याने देव मला त्याची सेवा करण्याची संधी तर देतो. प्रभू रामाच्या चरणी लीन होण्याची संधी तर देतोय.

काही दिवसांपासून बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज बागेश्वर बाबा हे प्रचंड चर्चेत आले आहे. त्यांच्या चमत्काराच्या दाव्यामुळे ते चर्चेत आले सोबतच अडचणीत सापडले. हा वाद संपत नाही तर बागेश्वर बाबा पुन्हा नव्या वादात सापडले आहे. त्यांनी आता संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल आक्षेपाहार्य विधान केले आहे. संत तुकाराम महाराज यांना त्यांची पत्नी रोज मारहाण करायची. म्हणूनच त्यांनी देवाचा धावा घेतला. असे विधान त्यांनी केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे हा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

काय होते बागेश्वर बाबाचे आक्षेपाहार्य विधान?

संत तुकाराम महाराष्ट्रातील एक महात्मा होते. त्यांची पत्नी त्यांना रोज मारायची. रोज काठीने मारायची. कुणी तरी त्यांना विचारलं, तुम्ही रोज बायकोचा मार खाता. तुम्हाला लाज नाही वाटत का? त्यावर तुकाराम म्हणाले, मला मारहाण करणारी बायको मिळाली ही देवाचीच कृपा आहे.

त्यावर ती व्यक्ती म्हणाली, यात देवाची कृपा काय? तेव्हा तुकाराम म्हणाले, अरे वा… प्रेम करणारी पत्नी मिळाली असती तर मी देवाच्या प्रेमात पडलो नसतो. भक्तीत लीन झालो नसतो. पत्नीच्या प्रेमात पडलो असतो. मारहाण करणारी पत्नी मिळाल्याने देव मला त्याची सेवा करण्याची संधी तर देतो. प्रभू रामाच्या चरणी लीन होण्याची संधी तर देतोय. असे विधान त्यांनी केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com