‘मनसे’ नंतर भाजपा दहीहंडी उत्सवासाठी आग्रही; ठाकरे सरकारला दिला इशारा

‘मनसे’ नंतर भाजपा दहीहंडी उत्सवासाठी आग्रही; ठाकरे सरकारला दिला इशारा

Published by :

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंतर आता भारतीय जनता पार्टी दहीहंडी उत्सव साजरा करण्यावर ठाम आहे. ठाकरे सरकारचा हिंदू उत्सव विरोधी कोणताही निर्णय… आम्हाला मान्य नाही अशी ठाम भूमिका घेत, भाजपा दहीहंडी उत्सव धडाक्यात साजरा करणारच, असा इशारा भाजपा प्रवक्ते राम कदम यांनी दिला आहे.

गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचं सावट असल्याचं सर्वच प्रकारच्या सण-उत्सव साजरे करण्यावर बंधन आली होती. यंदाच्या गणेशोत्सवावर सुद्धा अशीच बंधने आहेत. या पार्श्वभूमीवर यंदा कोरोना लसीकरण सुरू झाल्यानंतर आता मनसेनं दहीहंडी जल्लोषात साजरी करण्याचा निर्धार केला होता. यंदा ३१ ऑगस्ट रोजी विश्वविक्रमी दहीहंडी साजरी होणार असल्याचं मनसेकडून जाहीर करण्यात आलं आहे. त्यांनतर आता भाजपाने सुद्धा राज्यात भाजपा दहीहंडी उत्सव धडाक्यात साजरा करणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे दहीहंडी उत्सव साजरी करण्यासाठी 'मनसे' नंतर भाजप आग्रही आहे.

ठाकरे सरकारचा हिंदू उत्सव विरोधी कोणताही निर्णय आम्हाला मान्य नाही.श्रीकृष्ण जन्माष्टमी दहीहंडी उत्सव धूम धडाक्यात साजरा करणार असा इशाराच राम कदम यांनी सरकारला दिला आहे. त्यामुळे सरकार यावर काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com