समीर वानखेडेंवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल; सीबीआयचा घरावर छापा

समीर वानखेडेंवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल; सीबीआयचा घरावर छापा

आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडे चर्चेत आले होते.

मुंबई : एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर सीबीआयने भ्रष्टाचाराचा गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी सीबीआयने त्यांच्या घराची झडती सुध्दा घेतली आहे. दरम्यान, आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडे चर्चेत आले होते.

मुंबई जवळच्या समुद्रकिनाऱ्यावर क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणाचा समीर वानखेडे तपास करत होते. याप्रकरणी बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली होती. आर्यनची नंतर उच्च न्यायालयात जामिनावर सुटका करण्यात आली. यादरम्यान, समीर वानखेडे हे संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी ही कारवाई बोगस असल्याचा आरोप केला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com