”केंद्रानं राज्याला ओबीसी इम्पिरिकल डाटा द्यावा”

”केंद्रानं राज्याला ओबीसी इम्पिरिकल डाटा द्यावा”

Published by :

केंद्र सरकारने राज्य सरकारला ओबीसी इम्पिरिकल डाटा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केली. सह्याद्री अतिथिगृहात ओबीसी संदर्भातील मांगण्यावर बैठक संपलयानंतर पत्रकारांशी बोलताना ते बोलत होते.

सह्याद्री अतिथिगृहातील बैठक संपली आहे. या बैठकीत ओबीसी संदर्भातील मांगण्यावर चर्चा झाली. या बैठकीला ओबीसी नेते प्रकाश शेंडगे हे देखील उपस्थित होते. तसेच राज्य सरकारमधील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, मंत्री छगन भुजबळ आणि मंत्री नवाब मलिक हे या बैठकीला उपस्थित होते. प्रकाश शेंडगे यांच्यासह शिष्टमंडळ या बैठकीला उपस्थित होते.

या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले, सह्याद्री अतिथिगृहावर झालेल्या बैठकीत ओबीसी समाजाच्या अनेक महत्वाच्या मुद्यावर चर्चा झाली. यावेळी भुजबळ यांनी आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करावी, तसेच केंद्र सरकारने राज्य सरकारला ओबीसी इम्पिरिकल डाटा द्यावा, अशी मागणी केली. २४ ऑगस्टला ओबीसी आरक्षणासाठी आम्ही कोर्टात लढा देतोय असेही त्यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com