Central Railway Mega Block : मध्य रेल्वेवर १४ तासांचा मेगाब्लॉक

Central Railway Mega Block : मध्य रेल्वेवर १४ तासांचा मेगाब्लॉक

Published by :

मध्य रेल्वे ठाणे – दिवा स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर शनिवारी मध्यरात्री पासुन ते आज दुपारी 3.20 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. अप जलद मार्गांवर आज दुपारी 12.30 ते 2.30 वाजेपर्यंत 2 मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

ठाणे-दिवा दरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गांना सध्याच्या जलद मार्गांशी जोडण्यासाठी आणि क्रॉसओवरची कामे करण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार तर मेगाब्लॉक दरम्यान दिवा-ठाणे दरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गांवर गाड्या धावणार आहेत.

मुंबईहून कर्जत, कसारा, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, टिटवाळाकडील डाऊन मार्गावर रविवार २३ जानेवारी रोजी मध्यरात्री १ वाजून २० मिनिटांपासून, दुपारी ३ वाजून २० मिनिटांपर्यंत १४ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्याच बरोबर कर्जत, कसारा, अंबरनाथ, टिटवाळा, कल्याण, डोंबिवलीहून मुंबईच्या दिशेने अप जलद मार्गावर २३ जानेवारी दुपारी १२ वाजून ३० मिनिटांपासून ते २ वाजून ३० मिनिटांपर्यंत २ तासांचा मेगाब्लॉक असणार आहे. ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल प्रवाशांनी रेल्वे प्रशासनास सहकार्य करण्याची विनंती रेल्वेकडून विनंती करण्यात आली आहे.

कल्याणकडे जाणाऱ्या डाऊन जलद उपनगरीय व मेल, एक्स्प्रेस गाड्या ठाणे फलाट क्रमांक ५ मार्गे ठाणे – दिवा विभागातील नवीन डाऊन जलद अलाइनमेंटवर कळवा आणि मुंब्रा स्थानकांमधून धावतील. कल्याणकडे जाणाऱ्या डाऊन जलद उपनगरीय व मेल, एक्स्प्रेस गाड्या ठाणे फलाट क्रमांक ५ मार्गे ठाणे – दिवा विभागातील नवीन डाऊन जलद अलाइनमेंटवर कळवा आणि मुंब्रा स्थानकांमधून धावतील. 

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com