”ओबीसी आरक्षणासाठी 26 जूनला चक्काजाम आंदोलन करणार”

”ओबीसी आरक्षणासाठी 26 जूनला चक्काजाम आंदोलन करणार”

Published by :

राज्य सरकारने ओबीसींच्या (OBC Reservation) भविष्याचा खेळ खंडोबा केला आहे. त्याविरोधात आम्ही येत्या 26 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात चक्का जाम आंदोलन करण्यात येईल, अशी घोषणा भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केली.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी पार पडलेल्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. राज्य सरकारने ओबीसींचं राजकारण संपवलं आहे. सरकार नौटंकी करत आहे. दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. इम्पिरिकल डेटाचा आणि केंद्राचा काहीच संबंध नाही. राज्य सरकारने हा विषय हाताळायचा आहे, असं सांगतानाच जोपर्यंत ओबीसींना आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत राज्यात कोणत्याही निवडणुका होऊ देणार नाही. तसा निर्णयच आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे, असं मुंडे म्हणाल्या.

चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?

येत्या 26 जून रोजी ओबीसींच्या आरक्षणासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत. राज्यातील एक हजार स्पॉटवर हे आंदोलन होणार आहे. सरकारकडून ओबीसींची दिशाभूल होत असून त्याचा निषेध यावेळी करण्यात येणार आहे, असं सांगतानाच आरक्षण देणं हे सरकारच्या हातात असताना सरकारमधील लोक मोर्चे का काढत आहेत? असा सवाल भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com