चेंबूरमध्ये पडला पावडरचा पाऊस

चेंबूरमध्ये पडला पावडरचा पाऊस

Published by :

मुंबईच्या चेंबूर येथील माहुलगावात रासायनिक पावडर सदृश पाऊस पडल्याची घटना घडली आहे. यासर्व प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

एचपीसीएलच्या प्लांटमधून रासायनिक पावडरची गळती झाल्यानं संपू्र्ण गावात ही पावडर पसरली होती. शनिवारी दत्त जयंतीनिमित्त भंडाऱ्याच्या जेवणात देखील ही पावडर मिसळल्याची भीती व्यक्त केली जात होती. अचानक पावडर सदृश केमिकलचा पाऊस पडू लागल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.

या घटनेची माहिती मिळताच मुंबई पालिका अधिकारी गावात दाखल झाले. त्यावेळी एचपीसीएल कंपनीवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली. नंतर लक्षात आले की, एचपीसीएलच्या प्लांटमधून मोठ्या प्रमाणात कॅटलिस्ट पावडरची गळती झाली आणि ती विभागात पसरली असल्याचे समोर आलं. या पावडरमुळे कोणाला काही नुकसान झालं तर त्याला एचपीसीएल पूर्ण जबाबदार असेल, अशी भूमिका स्थानिक नागरिकांनी घेतली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com