मुख्यमंत्री शिंदे यांच्या पुतण्याला जुगार खेळताना पोलिसांनी केली अटक

मुख्यमंत्री शिंदे यांच्या पुतण्याला जुगार खेळताना पोलिसांनी केली अटक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुतण्याला जुगार खेळताना पोलिसांनी अटक केली आहे. महेश शिंदे असे त्यांचे नाव असून क्राईम ब्रांच पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुतण्याला जुगार खेळताना पोलिसांनी अटक केली आहे. महेश शिंदे असे त्यांचे नाव असून क्राईम ब्रांच पोलिसांनी ही कारवाई केली आहे. याप्रकरणी त्यांच्यांसह आणखी 10 जणांना अटक करण्यात आली आहे. यासंबंधी सामनाने वृत्त दिले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुतण्या महेश शिंदे मीरारोडवरील जीसीसी क्लब या हॉटेलमध्ये ४९७ नंबरच्या रुमध्ये जुगार खेळत होता. याठिकाणी पोलिसांनी छापेमारी करत महेश शिंदे यांच्यासह 10 जणांना ताब्यात घेतले आहे.

सुरुवातीला महेश शिंदे यांची चौकशी करुन सोडून देण्यात आले होते. याची माहिती नागरिकांना समजताच उलटसुलट चर्चा होण्यास सुरुवात झाली. वाढती कुजबूज पाहता पुन्हा रात्री उशिरा पोलिसांनी महेश शिंदे यांना ताब्यात घेत अटक केली. विशेष म्हणजे, हॉटेलमधील रुम एकनाथ शिंदे यांचे पुतणे महेश शिंदे यांच्या नावानेच बुक करण्यात आली होती.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी राज्याचं मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर त्यांच्याशी निगडीत सर्व गोष्टींवर नागरिकांचे बारीक लक्ष आहे. विरोधी पक्षाकडून शिंदे सरकारवर सातत्यांने टीका करण्यात येत होती. आता मुख्यमंत्री शिंदे यांच्या पुतण्याला जुगार खेळताना पोलिसांनी अटक केल्याने विरोधकांच्या हातात आयते कोलीत मिळाल आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com