सावधान! महाराष्ट्रावर ढग दाटले; कोकणासह विदर्भातही अतिवृष्टीचा इशारा

सावधान! महाराष्ट्रावर ढग दाटले; कोकणासह विदर्भातही अतिवृष्टीचा इशारा

राज्यात 17 जुलैपर्यंत सर्वत्र जोरदार पावसाचा अंदाज

मुंबई : राज्यात पावसानं (Heavy Rainfall) चांगलेच धुमशान घातलं आहे. अनेक ठिकाणी रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला आहे. कोकणासह विदर्भातही अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, राज्यात 17 जुलैपर्यंत सर्वत्र जोरदार पावसाची स्थिती राहणार असल्याचेही हवामान विभागाने (Weather Department) सांगितले आहे.

सावधान! महाराष्ट्रावर ढग दाटले; कोकणासह विदर्भातही अतिवृष्टीचा इशारा
धक्कादायक! पाऊस सुरू असताना स्मशानभुमीचे शेड पेटत्या मृतदेहावर पडले

हवामान विभागाच्या कल्पना सॅटेलाइटनं पाठवलेले संध्याकाळी सहा वाजताचे फोटो बघता संबंध महाराष्ट्रावर ढगांची प्रचंड दाटी दिसून येत आहे. यामुळे कोकण आणि गोवा किनारपट्टीवर सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीसह जोरदार पावसाची शक्यता आहे.

तर, विदर्भातही बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता असून मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीसारखा पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तर, मध्य महाराष्ट्रातही अतिवृष्टीसारखा पाऊस होणार असल्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यात 17 जुलैपर्यंत सर्वत्र जोरदार पावसाची स्थिती राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

सावधान! महाराष्ट्रावर ढग दाटले; कोकणासह विदर्भातही अतिवृष्टीचा इशारा
Maharashtra Rains : दोन हजार कोटींच्या शेगाव-पंढरपूर महामार्गाला तडे

दरम्यान, सतत पडणाऱ्या पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांच्या आणि धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. साशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com