सराईत गुन्हेगाराचा शिंदे गटात प्रवेश; फोटो व्हायरल

सराईत गुन्हेगाराचा शिंदे गटात प्रवेश; फोटो व्हायरल

खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते या प्रवेश करत असल्याचा एक फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेत एका सराईत गुन्हेगाराचा पक्ष प्रवेश झाला. खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते या प्रवेश करत असल्याचा एक फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. प्रशांत दिघे असे त्या गुन्हेगाराचे नाव असून त्याच्यावर तब्बल 18 गुन्हे दाखल आहेत. बारणेंना याबद्दल विचारलं असता त्यांनी युटर्न घेत त्याचा पक्षाशी काहीही संबंध नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे.

सराईत गुन्हेगाराचा शिंदे गटात प्रवेश; फोटो व्हायरल
तुम्ही ज्यांच्यासाठी नथीतून तीर मारताय ते आता...; एकनाथ शिंदेंना ठाकरे गटाचे प्रत्युत्तर

खासदार श्रीरंग बारणेंनी यांच्या हस्ते प्रशांत दिघेचा पक्षाप्रवेश झाला. आणि युवासेनेचे चिंचवड विधानसभा उपशहर प्रमुख या पदी विराजमान केलं. त्याच्यावर तब्बल अठरा गुन्हे दाखल आहेत. यात हत्या, हत्येचा प्रयत्न, दंगल अशा गंभीर गुन्ह्यांचा यात समावेश असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर श्रीरंग बारणेंना याबाबत विचारलं असता प्रशांत दिघेच्या पार्श्वभूमीबद्दल कल्पना नव्हती. असं म्हणत दिघेचं पद स्थगित केलं आणि यापुढं त्याचा पक्षाशी काही संबंध नसेल, असे जाहीर केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com