दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कोरोना पॉझिटिव्ह

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कोरोना पॉझिटिव्ह

Published by :

कोरोनाने सगळीकडे धुमाकूळ घातला आहे. यातच आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कोरोनाची लागण झाली आहे. याची माहिती स्वत: त्यांनी दिली आहे. अरविंद केजरीवाल यांनी आपल्याला सौम्य लक्षणं जाणवत असून घरात स्वत:ला विलगीकरणात ठेवण्यात आल्याची माहिती दिली आहे. 

केजरीवाल यांनी ट्विटमध्ये सांगितले की, "मी करोना पॉझिटिव्ह आढळलो आहे. सौम्य लक्षणं आहेत. घरातच स्वत:ला विलगीकरणात ठेवलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ला विलगीकरणात ठेवावं आणि चाचणी करुन घ्यावी," दिल्लीतील वाढत्या कोरोना रुग्णांमुळे मंगळवारी सकाळी ११ वाजता डीडीएएमची एक बैठकदेखील आय़ोजित आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com