2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे 'मिशन 45'

2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे 'मिशन 45'

2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचं मिशन 45 आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. पंतप्रधान मोदींनी केलेलं काम लोकांपर्यंत पोहचवा, असे देखील फडणवीस या वेळी म्हणाले.
Published by :
Shweta Chavan-Zagade

2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचं मिशन 45 आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आवाहन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले आहे. पंतप्रधान मोदींनी केलेलं काम लोकांपर्यंत पोहचवा, असे देखील फडणवीस या वेळी म्हणाले.

2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे 'मिशन 45'
विधान परिषदेसाठी धडपड, देशमुख-मलिक यांच्या याचिकेवर उद्या दुपारी 'निकाल'

"लोकसभा निवडणुकांच्या तयारीला लागा आणि मोदींनी केलेले कार्य जनतेपर्यंत पोहोचवा." असे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. मुंबईत आज काही वेळापूर्वी यासंदर्भातील बैठक पार पडली आहे. लोकसभा निवडणुकींच्या संदर्भात ही बैठक झाल्याचं भाजपच्या नेत्यांनी सांगितलं आहे. सध्या भाजपच्या ताब्यात नसलेल्या मतदारसंघावर जास्त लक्ष देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

"पुढच्या १७ ते १८ महिन्यात लोकसभा निवडणुकांसाठी कसं काम करायचं असं या बैठकीत ठरवण्यात आलं आहे. फक्त निवडणुकांच्या तोंडावर प्रचार करायचा नाही तर आत्तापासूनच जनतेसोबत काम करायचं आहे. राज्यात असलेल्या ४८ पैकी ४८ लोकसभा मतदारसंघात जिंकण्याचा प्रयत्न करणार आहोत." असं मत फडणवीस म्हणाले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com