शेतकऱ्यांचे अनुदान कर्जखात्यात जमा करू नये; फडणवीसांचे निर्देश

शेतकऱ्यांचे अनुदान कर्जखात्यात जमा करू नये; फडणवीसांचे निर्देश

देवेंद्र फडणवीसांनी घेतला खरीप हंगामपूर्व आढावा

भूपेश बारंगे | वर्धा : शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने दिले जाणारे अनुदान बँका शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा करत असल्याच्या तक्रारी आहे. असे अनुदान कर्ज खात्यात जमा करता येणार नाही. बँकांना याबाबत सक्त सूचना द्या, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. जिल्हा परिषदेच्या सिंधुताई सपकाळ सभागृहात फडणवीस यांनी जिल्ह्याचा खरीप हंगामपूर्व आढावा घेतला.

शेतकऱ्यांचे अनुदान कर्जखात्यात जमा करू नये; फडणवीसांचे निर्देश
बेसुमार लुटमार करून माती खाल्ली अन् मती...; आदित्य ठाकरेंवर श्रीकांत शिंदेंचा हल्लाबोल

सुरुवातीस जिल्हाधिकाऱ्यांनी खरीप हंगामासाठी केलेल्या तयारीचे सादरीकरण केले. खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा असतो. त्यामुळे बी-बियाणे, रासायनिक खते व अन्य कृषि निविष्ठा शेतकऱ्यांना मुबलकपणे उपलब्ध होतील. यासाठी प्रशासनाने काळजी घेण्याचे निर्देश फडणवीस यांनी बैठकीत दिले. बरेचदा बियाणे उगवत नाही, अशावेळी शेतकऱ्यांचे नुकसान होते. ही नुकसान भरपाई मिळण्यासाठी खरेदीची पावती जपून ठेवणे आवश्यक आहे. तशी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी. गेल्यावर्षी बियाणे न उगवलेल्या अनेक शेतकऱ्यांना आपण चांगली भरपाई मिळवून दिली असल्याचे फडणवीस म्हणाले.

अलीकडे कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. हा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कृषि विभागाने याबाबतचा योग्य सल्ला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविला पाहिजे. नुकसानग्रस्त पात्र शेतकऱ्यांना विमा कंपन्यांनी नुकसान भरपाई देणे आवश्यक आहे. मात्र, कंपन्या भरपाई देण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी येत असतात. अशा कंपन्यांवर कारवाई करण्याचे निर्देश फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनास दिले.

नानाजी देशमुख कृषि संजिवनी (पोकरा) योजना शेतकऱ्यांसाठी अतिशय चांगली योजना आहे. ज्या ठिकाणी यंत्रणेने पुढाकार घेऊन ही योजना राबविली तेथे अतिशय चांगले परिणाम दिसून आले आहे. जिल्ह्यात या योजनेची उत्कृष्ट अंमलबजावणी होण्यासाठी यंत्रणेने पुढाकार घ्यावा. दुसऱ्या टप्प्यात योग्य प्रकारे गावांची निवड करावी. जलयुक्त शिवार योजना आपण मोठ्या प्रमाणावर राबविली. या योजनेमुळे 50 टक्के पाऊस झालेल्या क्षेत्रातही संरक्षणात्मक सिंचन उपलब्ध झाले आहे. त्यामुळे ही योजना देखील चांगल्या पध्दतीने राबविण्यात यावी.

पांदनरस्ते मोकळे करण्यासाठी काही दिवसात चांगली योजना आपण तयार करतो आहे. वर्धा जिल्ह्यात पांदन रस्त्याचे काम मोठ्या प्रमाणात झाले पाहिजे. शेताच्या फवारणीचे काम ड्रोन आधारीत होणे आवश्यक आहे. जिल्ह्यात यासाठी चांगले काम कसे करता येईल, याबाबत अभ्यास करुन अहवाल सादर करावा. एखाद्या डीपीवरील काही शेतकरी थकीत असल्यास डीपीचा वीज पुरवठा बंद केला जातो. यामुळे नियमित देयके अदा करणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा फटका बसतो. त्यामुळे अशा डीपीवरील वीज पुरवठा बंद करु नये, असे निर्देश फडणवीस यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले. शेतकऱ्यासाठी सोलर फीडर आपण बसवित आहोत. त्यासाठी तातडीने जागा उपलब्ध करुन देण्याच्या सुचना देखील त्यांनी केल्या. पीककर्ज शेतकऱ्यांना सहजतेने उपलब्ध होण्यासाठी विशेष कर्जवाटप शिबिरे घेण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनास केल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com