देवेंद्र फडणवीस ‘शिवतीर्थ’वर राज ठाकरेंच्या भेटीला जाणार, कारण...

देवेंद्र फडणवीस ‘शिवतीर्थ’वर राज ठाकरेंच्या भेटीला जाणार, कारण...

देवेंद्र फडणवीस आज दुपारी दोन वाजता दादर येथील राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाणार आहेत. आता या भेटीत काही महत्त्वाची चर्चा होऊन राजकीय नाट्याचा पुढचा अंक पाहायला मिळणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
Published by :
Shweta Chavan-Zagade

गेल्या काही काळापासून मनसे (MNS) आणि भाजपमधील (BJP) जवळीक वाढत आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसभा, विधानपरिष, विधानसभा अध्यक्षपद निवडणूक आणि विश्वासदर्शक ठरावावेळी मनसेच्या आमदाराने भाजपला साथ दिली होती. त्यासाठी देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी विधानसभेत राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे जाहीर आभार मानले होते. तसेच आपण लवकर त्यांची भेट घेऊन आभार मानू, असेही म्हटले होते. त्यानुसार आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भेटीला जाणार आहेत. देवेंद्र फडणवीस आज दुपारी दोन वाजता दादर येथील राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाणार आहेत. आता या भेटीत काही महत्त्वाची चर्चा होऊन राजकीय नाट्याचा पुढचा अंक पाहायला मिळणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

देवेंद्र फडणवीस ‘शिवतीर्थ’वर राज ठाकरेंच्या भेटीला जाणार, कारण...
Presidential election : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान साहित्य मुंबईत दाखल

राज ठाकरे यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे त्यांना डॉक्टरांनी साधारण तीन महिने सक्तीची विश्रांती घेण्यास सांगितले होते. राज ठाकरे लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) यांनीही बंड केल्यानंतर राज ठाकरे यांच्याशी फोनवरुन संवाद साधला होता.

देवेंद्र फडणवीस ‘शिवतीर्थ’वर राज ठाकरेंच्या भेटीला जाणार, कारण...
बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच; एकनाथ शिंदे यांचं नवं ट्विट

तर मनसेच्या एकमेव आमदाराने विधानसभा अध्यक्षपद निवडणूक आणि विश्वासदर्शक ठरावावेळी शिंदे-फडणवीस सरकारच्या बाजूने मतदान केले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि मनसे हे नेहमीच परस्परांचे कट्टर प्रतिस्पर्धी राहिले आहेत. मात्र, आता शिवसेना खिळखिळी झाल्यानंतर आगामी निवडणुकांमध्ये मनसे याचा फायदा घेऊन आपला विस्तार करणार का, हे पाहावे लागेल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com