Pune |
Pune | Team Lokshahi

डॉ. आदित्य पतकराव ऑस्कर ऑफ दंतचिकित्साने सन्मानित

जगातील सर्व देशांतील दंतवैद्य 'द फेमस एक्सलन्स इन डेंटिस्ट्री अवॉर्ड'साठी अर्ज करतात
Published by :
Sagar Pradhan

नवी दिल्ली : प्रसिद्ध दंतचिकित्सक प्रसिद्ध दंत चिकित्सक डॉ. आदित्य पतकराव यांना 'द फेमस एक्सलन्स इन डेंटिस्ट्री अवॉर्ड-2022' या प्रतिष्ठित सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे, ज्याला दंतचिकित्सा क्षेत्रातील ऑस्कर म्हटले जाते. चैनईत फॅमडेंटतर्फे आयोजित सत्कार समारंभात त्यांना हा सन्मान देण्यात आला.

Pune |
मुकेश अंबानींची मोठी घोषणा; दिवाळीच्या मुहूर्तावर 5G होणार लॉन्च

हा सन्मान दंतचिकित्सा क्षेत्रात दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा सन्मान आहे, जो आत्तापर्यंत दरवर्षी या क्षेत्रातील निष्ठावंताला दिला जात आहे. यामध्ये भारतासह जगातील सर्व देशांतील दंतवैद्य 'द फेमड एक्सलन्स इन डेंटिस्ट्री अवॉर्ड'साठी अर्ज करतात. यामध्ये ते प्रॅक्टिस, मेडिकल केस आणि इनोव्हेशनबद्दल सांगतात. यानंतर त्यांच्यामधून 8 डॉक्टरांची निवड केली जाते आणि त्यापैकी एकाला हा पुरस्कार पुरस्कार दिला जातो.

यंदाच्या वर्षीचा हा पुरस्कार पुण्यामधील नवी सांगवी येथील डॉ. आदित्य पतकराव यांना प्रदान केला आहे. हा पुरस्कार देताना ब्रिटिश डेप्युटी हायकमिशन व लंडन पार्लिमेंटचे सिनेट सदस्य ऑलिव्हर बॉलहॅचेट यांनी डॉ. पतकराव यांचे कौतुक केले. तसेच त्यांना बॉलहॅचेट यांनी व्हिजनरी डेंटिस्ट हे मॅगझीन दिले. या सोहळ्यास ब्रिटिश डेप्युटी मेयर डॉ. चारुलता देवेंद्रने, तामिळनाडूचे शिक्षणमंत्री थिरु आंबील महेश पय्यमोझी आणि आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती.

Pune |
कल्याण डोंबिवलीतील गणेशोत्सवासाठी पोलीस सज्ज; 2 हजार कॅमेऱ्यांची असणार करडी नजर

डॉ. आदित्य पतकराव यांना याआधीही अनेक नामांकित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, नुकताच त्यांना दुबई येथील रॉयल पॅलेस येथे अल जरूनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच, डॉ. आदित्य पतकराव यांची सर्वाधिक कर देणारे डेंटीस्ट म्हणूनही वर्ल्ड बुक ऑफ लंडन येथे नोंद झालेली आहे. डॉ. आदित्य यांचे नवी सांगवी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे डेंटल हॉस्पिटल आहे. लाखो रुग्णांना अत्याधुनिक पद्धतीने ते रुग्णसेवा पुरवित आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com