H3N2 Virus Alert : मुख्यंमत्र्यांचे मास्कबाबत महत्वपूर्ण विधान; नागरिकांनाही दिल्या 'या' सूचना

H3N2 Virus Alert : मुख्यंमत्र्यांचे मास्कबाबत महत्वपूर्ण विधान; नागरिकांनाही दिल्या 'या' सूचना

राज्यात नव्याने उद्भवलेल्या इन्फल्युएंझा संसर्ग एच -३ एन- २ आजारा विषयीची आढावा बैठक मुख्यमंत्र्यांनी आज विधान भवन येथे घेतली.

मुंबई : इन्फल्युएंझा आजारावर तातडीने उपचार सुरु केल्यास आजार लवकर बरा होण्यास मदत होते. त्यामुळे लक्षणे आढळल्यास वेळीच उपचार सुरु करावेत. याबाबत अधिक माहिती लोकांपर्यंत पोहचावी यासाठी जनजागृती करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्या. राज्यात नव्याने उद्भवलेल्या इन्फल्युएंझा संसर्ग एच -३ एन- २ आजारा विषयीची आढावा बैठक मुख्यमंत्र्यांनी आज विधान भवन येथे घेतली. यावेळी त्यांनी प्रशासनासह नागरिकांनाही सूचना दिल्या आहेत.

H3N2 Virus Alert : मुख्यंमत्र्यांचे मास्कबाबत महत्वपूर्ण विधान; नागरिकांनाही दिल्या 'या' सूचना
शेतकऱ्यांचा मोर्चा तात्पुरता स्थगित, जेपी गावितांची माहिती; ...तर लाल वादळ मुंबईत धडकणार

काय आहेत लक्षणे?

इन्फल्युएंझा आजार विषाणुमुळे होणारा आजार आहे. इन्फल्युएंझाचे टाईप A, B आणि C असे प्रकार आहेत. इन्फल्युएंझा टाईप ए चे उपप्रकार H1 N1, H2N2,H3 N2 असे आहेत. यात ताप, खोकला, घशात खवखव, धाप लागणे, न्युमोनिया अशी लक्षणे आढळतात.

नागरिकांना मार्गदर्शक सूचना

रुग्णाच्या सहवासात आल्यापासून दहा दिवसात फ्ल्यू सारखी काही लक्षणे आढळल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा.

सर्दी खोकला अंगावर काढु नका त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

डॉक्टरांच्या सल्ल्याने फ्लुवरील औषध सुरु करावे.

डॉक्टरांच्या सल्ल्याने सुरु केलेल्या उपचारा सोबतच गरम पाण्याची वाफ घ्यावी.

खोकला असल्यास मास्क किंवा तीन पदर करुन हात रुमाल वापरावा.

आजारी व्यक्तीनी सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे, अशा सुचनांचा समावेश आहे.

कर्मचाऱ्यांसाठी सूचना

या संसर्गाने बाधित झालेल्या रुग्णांवर तातडीने उपचार व्हावेत. यासाठी लागणारा औषधसाठा पुरेसा असल्याची खात्री करावी.

सध्या सुरु असलेल्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे उपचार करण्यात अडचण येऊ नये यासाठी खासगी रुग्णालयांची मदत घ्यावी.

आवश्यकता वाटल्यास खासगी कंत्राटी कर्मचारी नेमुन उपचाराचे काम सुरु ठेवावे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com