मंत्रिपदावरुन शिंदे गटातील आमदारांमध्ये धुसफूस
शिंदे-फडणवीस सरकारचा गेल्या 40 दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर मंगळवारी झाला. भाजप व शिंदेसेनेच्या प्रत्येकी 9 अशा एकूण 18 आमदारांचा शपथविधी झाला.... विस्तारामध्ये शिंदे गट व युतीच्या सरकारमधीलच मंत्र्यांना पुन्हा संधी देण्यात आली.... परंतु ज्यांना संधी मिळाली नाही, त्याची समजूत काढण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कसरत करावी लागली.
राज्यात मंगळवारी 18 जणांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्र्यांची संख्या 20 झाली आहे. मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटातनंतर आलेल्यांना आधी मंत्रिपद मिळाल्याने नाराजीचाा सूर आहे. शिंदे गटात सहभागी झालेले दीपक केसरकर, संजय राठोड, दादा भुसे, गुलाबराव पाटील, उदय सामंत यांना पहिल्याच टप्प्यात मंत्रिपद मिळाले. शिंदे गटात जाण्याचा क्रम बघितला तर हे पाचजण 34 ते 38 व्या क्रमांकावर होते.
शिंदे गटाची गुप्त रणनिती आखण्यापासून बंड घडवण्यात महत्वाची भूमिका असलेल्या बालाजी किणीकर, संजय शिरसाट, भरत गोगावले, आशिष जयस्वाल, महेश शिंदे यांना मंत्रिपद मिळाले नाही. संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, शंभूराज देसाई आणि तानाजी सावंत हे ही पहिल्या दिवसापासून शिंदे यांच्यासोबत भक्कमपणे होते. त्यांना मंत्रीपदाचे बक्षीस मिळाले.
नाराजीनाट्य दूर होणार
शपथविधीच्या आधी नाराजी दूर करण्यासाठी शिंदेंनी बैठक घेतली
शिंदें यांनी भरत गोगावलेंना आपल्या गाडीतून नेत नाराजी दूर केली
संजय शिरसाट यांनी माध्यमांकडे थोडा नाराज झाल्याचे मान्य केले
नाराजांना दुसऱ्या विस्तारात संधी देण्याचे मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला
शिवसेनेत बंडाची गुप्त तयारी सुरू झाली तेव्हा आणि प्रत्यक्ष निशाण फडकविले गेले तेव्हाही एकनाथ शिंदे यांना साथ देणाऱ्या पहिल्या शिलेदारांवर मंत्रिमंडळ विस्तारामध्ये स्थान मिळाले नाही. दुसऱ्या विस्तारामध्ये त्यांचा असंतोष शिंदे यांना दूर करावा लागणार आहे. अन्य कोणत्याही आमदारांपेक्षा मुंबईतील पाच आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडणे आव्हानात्मक होते, पण त्यांच्यापैकी कोणीही मंत्री झाले नाही. एकंदरीत या नाराजी नाट्यानंतर शिंदे गटात सर्वच आलबेल नसल्याचे दिसत आहे...