नवी मुंबईत १५ ते १६ एप्रिलपर्यंत अवजड वाहनांना प्रवेश बंद

नवी मुंबईत १५ ते १६ एप्रिलपर्यंत अवजड वाहनांना प्रवेश बंद

पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी सांगितली माहिती

ठाणे : नवी मुंबईतील खारघर येथे राज्य शासनामार्फत रविवारी होणाऱ्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानिमित्त १५ एप्रिल ते १६ एप्रिल या काळात नवी मुंबईतील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. यादरम्यान सर्व प्रकारच्या जड व अवजड वाहनांना या काळात प्रवेश बंद करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी सांगितली आहे.

नवी मुंबईत १५ ते १६ एप्रिलपर्यंत अवजड वाहनांना प्रवेश बंद
संदीपान भुमरेंच्या टीकेला खैरेंचे उत्तर; हा दहा दिवसांचा पालकमंत्री

नवी मुंबईतील खारघर येथे होणाऱ्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमासाठी राज्यातील विविध जिल्हयातून व इतर राज्यातून खारघर येथील कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहने जाणार व येणार आहे. त्यामुळे या काळात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच आयुक्तालय क्षेत्रातील सर्व रस्त्यावरील वाहतुक सुरळीत व सुरक्षित रहावी याकरीता १५ एप्रिल २०२३ रोजी दुपारी 2 ते १६ एप्रिल २०२३ रोजी रात्री 11 वाजेपर्यंतच्या कालावधीत नवी मुंबई आयुक्तालय क्षेत्रात सर्व जड - अवजड वाहनाच्या येण्यास व जाण्यास बंदी घालण्यात आल्याची माहिती नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील वाहतुक शाखेचे उपायुक्त तिरुपती काकडे यांनी कळविली आहे.

असा आहे वाहतुकीतील बदल

१. ठाणे जिल्ह्यातून ऐरोली टोल नाका, तसेच विटावाकडुन ठाणे बेलापूर रोडने तसेच शिळफाटयाकडून महापे व तळोजा कडुन जुना मुंबई पुणे महामार्गाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत येणाऱ्या व जाणाऱ्या जड अवजड वाहनाना प्रवेश बंदी करण्यात येत आहे.

२. मुंबई शहराकडून सायन पनवेल महामार्गावरील वाशी टोल नाका व पूर्व द्रुतगती मार्गाने ऐरोली टोल नाका मार्गे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत येणाऱ्या व जाणाऱ्या जड अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

३. गोवा महामार्गाने खारपाडा टोलनाका मार्गे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत येणाऱ्या व जाणाऱ्या जड-अवजड वाहनाना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

४. पुणे मुंबई महामार्ग व पुणे मुंबई द्रुतगती महामार्गाने कोनफाटा पळस्पे सर्कल शेडुग टोल नाका मार्गे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत येणाऱ्या व जाणाऱ्या जड अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

५. जेएनपीटी बंदर, उरण पनवेल येथील सर्व सीएफएस एमटीयार्ड, व इतर आस्थापना यांच्याकडून गव्हाणफाटा, दास्तानफाटा तसेच पनवेल टी पॉईट मार्गाने सायन-पनवेल मार्गावर नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत येणाऱ्या व जाणाऱ्या जड अवजड वाहनाना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

६. नवी मुंबई आयुक्तालय अंतर्गत असलेल्या सर्व रस्त्यांवर जड अवजड वाहनाना पूर्णपणे प्रवेश बंदी करण्यात येणार आहे.

तसेच सदरची वाहतूक नियंत्रण अधिसूचना ही अत्यावश्यक सेवेतील जड-अवजड वाहनांना लागू असणार नाही, असेही काकडे यांनी सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com