PM Narendra Modi
PM Narendra Modi

पहिला लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाहीर

Published by :

यंदा पहिल्यांदाच ‘लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार’ (Lata Dinanath Mangeshkar Award) प्रदान करण्यात येणार आहेत.त्यात आता पहिला लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार (Lata Dinanath Mangeshkar Award) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना जाहीर करण्यात आला आहे. सर्वोत्कृष्ट देशसेवा आणि जनसेवेसाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यावर्षीपासून सुरू झालेल्या लता दिनानाथ मंगेशकर पुरस्काराचे (Lata Dinanath Mangeshkar Award) पहिले मानकरी ठरले आहेत. सर्वोत्कृष्ट देशसेवा आणि जनसेवेसाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट संगीत कारकीर्दीसाठी गायक राहुल देशपांडे (Rahul Deshpande) यांना पुरस्कार देण्यात आला आहे. तर सिनेमातल्या कारकिर्दीसाठी अभिनेत्री आशा पारेख (Aasha Parekh) आणि अभिनेते जॅकी श्रॉफ यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. सामाजिक कार्यासाठी आनंदमयी पुरस्कार नुतन मुंबई टिफीन चॅरिटेबल ट्रस्ट म्हणजे मुंबईच्या डब्बेवाल्यांना जाहीर झाला असून संध्याछाया या नाटकासाठी दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि निर्माते श्रीपाद पद्माकर यांनाही पुरस्कार जाहीर झाले आहेत.

येत्या २४ एप्रिलला मास्टर दिनानाथ मंगेशकर यांची ८० वी पुण्यतिथी साजरी होणार असून त्यानिमित्ताने मास्टर दिनानाथ मंगेशकर पुरस्कारांची सोमवारी घोषणा करण्यात आली. यावेळी पंडित हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, भारती मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर आणि हृदयेश आर्ट्सचे अविनाश प्रभावळकर उपस्थित होते. दिनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे आयोजित या पुरस्कारांचे वितरण २४ एप्रिल रोजी षण्ङमुखानंद हॉल येथे संध्याकाळी सहा वाजता संपन्न होणार आहे. उषा मंगेशकर अध्यक्षा कार्यक्रमाच्या अध्यक्षा असून त्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. स्वरलतांजली या खास कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com