हृदयद्रावक!  आधी आईचा मृत्यू अन् दोन तासानंतर मुलाचाही मृत्यू

हृदयद्रावक! आधी आईचा मृत्यू अन् दोन तासानंतर मुलाचाही मृत्यू

हृदय हेलावून टाकणारी ही घटना वाळवा तालुक्यातल्या कारंदवाडी या ठिकाणी घडली आहे.

संजय देसाई | सांगली : दुर्धर आजारामुळे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मुलाच्या प्रकृतीच्या चिंतेने आईची प्रकृती बिघडली. व आईने प्राण सोडले. त्यानंतर अवघ्या दोन तासातच मुंबईत उपचार घेणाऱ्या मुलाने देखील आपले प्राण सोडले. हृदय हेलावून टाकणारी ही घटना वाळवा तालुक्यातल्या कारंदवाडी या ठिकाणी घडली आहे. शहाबाई विलास पाटील (वय 62) आणि शहाजी विलास पाटील (वय 43) असे या दोघा माय -लेकाचं नावे आहेत.

हृदयद्रावक!  आधी आईचा मृत्यू अन् दोन तासानंतर मुलाचाही मृत्यू
कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच, काँग्रेस लढणार : सुत्र

गेला मागील महिन्यापासून मुलगा शहाजी आजारी होता. मात्र, त्याची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती. त्यामुळे आई शहाबाई यांना या गोष्टीची चिंता लागून राहिली होती. या चिंतेतून त्यांची देखील प्रकृती बिघडली आणि उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या बाजूला लगेच दोन तासाच्या अंतराने मुंबईत उपचार सुरू असणाऱ्या मुलाचाही मृत्यू झाला. मकर संक्रांतीच्या दिवशी मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com