माजी सरन्यायाधीश शरद बोबडे-मोहन भागवत यांची भेट

माजी सरन्यायाधीश शरद बोबडे-मोहन भागवत यांची भेट

Published by :

माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांची नागपुरात भेट घेतली. आरएसएसच्या पदाधिकाऱ्यांनी याबद्दल कोणतीच माहिती नसल्याचं म्हटलं आहे. या भेटीमुळे आता नवीन चर्चांना उधाण आलं आहे.

दोघांमध्ये तासभर नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही. तसेच मोहन भागवत किंवा माजी सरन्यायाधीश बोबडे या दोघांकडूनही या बैठकीबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
संघ मुख्यालयात संघप्रमुखांची औपचारिकपणे भेट घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. याशिवाय बोबडे यांनी आरएसएसचे संस्थापक केबी हेडगेवार यांच्या जुन्या घरालाही भेट दिल्याची माहिती मिळत आहे.

माजी सरन्यायाधीश बोबडे हे नागपूरचे आहेत. त्यांनी अनेक वर्षे नागपुरातच कायद्याची प्रॅक्टिस केली होती. बोबडे या वर्षाच्या सुरुवातीला निवृत्त झाले. त्यानंतर ते त्यांचा पूर्ण वेळ दिल्ली आणि नागपुरात घालवत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com