BJP MLA Dadarao Keche
BJP MLA Dadarao KecheTeam Lokshahi

वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या कुटुंबातील सदस्याला शासकीय नोकरी द्या ; भाजप आमदार दादाराव केचे यांची मागणी

आष्टी कारंजा तालुक्यात पाच वर्षात ;12 जणांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू 5 जण जखमी तर 399 जनावरे ठार
Published by :
Vikrant Shinde

भूपेश बारंगे | वर्धा: राज्य सरकारने वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या कुटुंबातील एका सदस्यांना शासकीय नौकरी द्या आणि जंगल शेजारील शेतीला शंभर टक्के अनुदानावर सौर कंपाउंड द्या अशी मागणी आज कारंजा विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत आमदार दादाराव केचे यांनी मागणी केली आहे.

BJP MLA Dadarao Keche
"अशोक चव्हाणांसोबत आम्हीच एकनाथ शिंदेना सत्ता स्थापनेची विनंती केली होती" अब्दूल सत्तार यांचा खळबळजनक दावा

आर्वी विधानसभा मतदारसंघातील कारंजा,आष्टी, आर्वी तालुक्यात सर्वाधिक जंगल क्षेत्र आहे. त्यात कारंजा तालुक्याला बोर अभयारण्य क्षेत्र असल्याने या परिसरात हिसंक प्राण्याचे वावर आहे.यात अनेकदा शेतकरी ,शेतमजूर, गुराखी नागरिकांना दिवसाढवळ्या वाघाचे दर्शन असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.पाच वर्षात आष्टी व कारंजा तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात 12 जणांचा मृत्यू झाला आहे, तर काही जण जखमी झाले होते, तर ३९९ जनावरे मृत्युमुखी पडले आहे. बांगडापूर येथे पशुपालकाचा वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना ताजी असताना बैल चारायला गेले दोन युवक थोडक्यात बचावले. यामुळे शेतकऱ्यांत दहशत पसरली आहे. यामुळे वाघिणीला तात्काळ पिंजऱ्यात अडकून दुसऱ्या ठिकाणी हलवण्याची मागणी यावेळी केली आहे. कारंजा तालुक्यातील मनोहर कुडमते, संदीप सहारे, रामेश्वर परिसे, भुपेंद्र गाखरे ,मुकुंदा ढोके, श्रीराम बिटने, लक्ष्मण हुके, सुशीला मंडारी, अविता मंडारी, होरेश्वर घसाळ तर आष्टी तालुक्यातील भिवाजी हरले, जगन विघ्ने, बकाराम धुर्वे, रामदास भगत ,सुबराव बासकवरे यांच्या वर वाघाने हल्ला केला तर यात काही जणांचा मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले होते. भाजप शिवसेना युतीचा सरकारने वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या कुटुंबाना आर्थिक मोबदला हा सर्वाधिक वाढून दिला आहे.15 लाखाचा निधी हा 20 लाखापर्यंत वाढवला आहे .हे सरकार शेतकरी सर्वसामान्य जनेतचे आहे त्यामुळे शेतकरी सर्वसामान्य न्याय देणार सरकार आहे .यामुळे माझ्या मतदार संघात वाढत्या घटनेने अनेकांना जीव गमवावा लागला यामुळे येथील वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या कुटुंबातील एका सदस्याला नौकरीत देण्याचा निर्णय तात्काळ घ्यावा अशी मागणी केली जाणार आहे.हे सरकार शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्यचे हितचिंतक सरकार आहे त्यामुळे हे सरकार तातडीने लक्ष घालावे.अशी पत्रकार परिषदेत माहिती दिली यावेळी आमदार दादाराव केचे, शिरीष भांगे, संजय कदम, निलेश देशमुख, मुन्ना अग्रवाल, किशोर भांगे, राजेश काळे, दिलीप हिंगणिकर, प्रमोद चव्हाण, शैलेश घिमे यांची उपस्थिती होती.

सहाय्यक वनसंरक्षक अधिकाऱ्याच्या बाबत पत्र देणार:

कारंजा वनविभाग कार्यालयात असलेल सहाय्यक वनसंरक्षक कार्यालय हे कुलूपबंद असून हे कार्यालय शेतकऱ्यांचा सोयीसुविधा करीत तातडीने सुरू करण्याची मागणी केली जाणार आहे यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ,वनमंत्री यांना तात्काळ पत्र देण्यात येणार आहे असे आमदार दादाराव केचे यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com