Grampanchayat
GrampanchayatTeam Lokshahi

आज होणार राज्यातील 18 जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर

राज्यात 18 जिल्ह्यातील 1 हजार 165 ग्रामपंचायती आणि त्याच्या सरपंचपदासाठी मतदान पार पडले, सरासरी 74 टक्के मतदान

राज्यात राजकीय गदारोळ सुरु असताना एकीकडे राज्यातील 1 हजार 165 ग्रामपंचायतीसाठी मतदान पार पडले आहे. अंदाजानुसार, सरासरी 74 टक्के मतदान झाले. यामध्ये सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठीदेखील मतदान पार पडले. राज्यातील 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठी मतदान झाले आहे.

Grampanchayat
राज ठाकरेंनी सांगितला फडणवीस आडनावाचा अर्थ; म्हणाले, फड म्हणजे....

राज्य निवडणूक आयोगाने 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यातील काही ठिकाणी सरपंचपदाच्या, तर काही ठिकाणी सदस्यपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. त्यामुळे रविवारी प्रत्यक्षात 1 हजार 79 ग्रामपंचायतींसाठी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळत मतदान झाले. दुपारी 3.30 पर्यंत प्राथमिक माहितीनुसार सरासरी 64.83 टक्के मतदान झाले होते. आता या सर्व ग्रामपंचायतीचा आज रोजी निकाल जाहीर होणार आहे.

Grampanchayat
राज ठाकरे आणि पवारांच्या मागणीवर शिंदे गटाची प्रतिक्रिया; म्हणाले, सगळा प्रकार झाल्यावर काय...

या ठिकाणी पार पडली आज निवडणुक

पुणे: मुळशी- 1 आणि मावळ- 1.

सातारा: जावळी- 5, पाटण- 5 आणि महाबळेश्वर- 6.

कोल्हापूर: भुदरगड- 1, राधानगरी- 1, आजरा- 1 आणि चंदगड- 1.

अमरावती: चिखलदरा- 1.

वाशीम: वाशीम- 1.

नागपूर: रामटेक- 3, भिवापूर- 6 आणि कुही- 8.

वर्धा: वर्धा- 2 व आर्वी- 7.

चंद्रपूर: भद्रवाती- 2, चिमूर- 4, मूल- 3, जिवती- 29, कोरपणा- 25, राजुरा- 30 आणि ब्रह्मपुरी- 1.

भंडारा: तुमसर- 1, भंडारा- 16, पवणी- 2 आणि साकोली- 1.

गोंदिया: देवरी- 1, गोरेगाव- 1 गोंदिया- 1, सडक अर्जुनी- 1 आणि अर्जुनी मोर- 2.

गडचिरोली: चामोर्शी- 2, आहेरी- 2, धानोरा- 6, भामरागड- 4, देसाईगंज- 2, आरमोरी-2, एटापल्ली- 2 आणि गडचिरोली- 1.

ठाणे: कल्याण- 7, अंबरनाथ- 1, ठाणे- 5, भिवंडी- 31, मुरबाड- 35, आणि शहापूर- 79.

पालघर: डहाणू- 62, विक्रमगड- 36, जवाहार- 47, वसई- 11, मोखाडा- 22, पालघर- 83, तलासरी- 11 आणि वाडा- 70.

रायगड: अलिबाग- 3, कर्जत- 2, खालापूर- 4, पनवेल- 1, पेण- 1, पोलादपूर- 4, महाड- 1, माणगाव- 3 आणि श्रीवर्धन- 1.

रत्नागिरी: मंडणगड- 2, दापोली- 4, खेड- 7, चिपळूण- 1, गुहागर- 5, संगमेश्वर- 3, रत्नागिरी- 4, लांजा- 15 आणि राजापूर- 10.

सिंधुदुर्ग: दोडामार्ग- 2 आणि देवडगड- 2.

नाशिक: इगतपुरी- 5, सुरगाणा- 61, त्र्यंबकेश्वर- 57 आणि पेठ- 71.

नंदुरबार: अक्कलकुवा- 45, अक्राणी- 25, तळोदा- 55 आणि नवापूर- 81.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com