थेट आफ्रिकेहून पोहोचला सांगलीत हापूस आंबा; किंमत माहितीय का ?

थेट आफ्रिकेहून पोहोचला सांगलीत हापूस आंबा; किंमत माहितीय का ?

Published by :

संजय देसाई, सांगली | सांगलीकर आंबा खवय्यांसाठी एक गोड बातमी आहे,ती म्हणजे हिवाळ्यात त्यांना आंब्याची चव चाखायला मिळणार आहे.कारण थेट दक्षिण आफ्रिकाहुन हापूस आंबा सांगलीच्या बाजारपेठेत दाखल झाला आहे.तब्बल साडेतीन हजार रुपये डझन आणि 291 रुपयाला एक इतकी या आफ्रिकन आंब्याची किंमत आहे.

देशामध्ये मार्च महिन्यानंतर उन्हाळ्याच्या आसपास आंब्याचा सिझन सुरू होतो.तर देशात कोकणातला हापूस आंबा हा सर्वदूर प्रसिद्ध आहे,परदेशातही या आंब्याला चांगली मागणी असते. मात्र एरवी हा हापूस आंबा मिळत नाही.पण आता हिवाळ्यात ही हापूस आंबा खवय्यांसाठी उपलब्ध झाला आहे.

सांगलीच्या विष्णुअण्णा फळ मार्केटमध्ये थेट दक्षिण आफ्रिककेहून हापुस आंबा दाखल झाला आहे.दक्षिण आफ्रिकेतील मलावी राष्ट्रातून हा हापूस आंबा सांगलीत पोहचला आहे.सध्या तरी 100 बॉक्स आवक झाली आहे.पण सर्वसामान्यांच्या आवाक्यात हा आंबा नसणार आहे, कारण तब्बल साडेतीन हजार रुपये डझन आंब्याची किंमत आहे,म्हणजे 291 रुपये इतकी एका आंब्याची किंमत आहे.मात्र चवीने खाणार्‍या आंबा खवय्यांसाठी थांबा आता उपलब्ध झाला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com