आगीत घर खाक झाल्याने उघड्यावर आलेल्या कुटुंब मदत

आगीत घर खाक झाल्याने उघड्यावर आलेल्या कुटुंब मदत

Published by :

भूपेश बारंगे

वर्ध्यातील कारंजा मधील जसापूर येथे काल सायंकाळच्या दरम्यान घराला आग लागली यात बेबीताई गोरे यांचे संपूर्ण घर खाक झाले.घरातील कपडे, अत्यावश्यक वस्तूसह, कापूस ,सोयाबीन,इतर धान्य जळून खाक झाले. पंचायत समिती अंतर्गत घरकुल मंजूर झाल्याने घर बांधकामाला मुलीकडून 30 हजार रुपये आणले तेही या आगीत जळून राख झाले. घरात बेबीताई व मुलगी राहत होती काल घरात सणानिमित्त स्वयंपाक सुरू होता या दरम्यान घटना घडली.

दोघीही मायलेकी घराबाहेर पडताच आगीने मोठे रौद्ररूप धारण केले. घराला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न गावकऱ्यांनी केला मात्र तोपर्यंत संपूर्ण घर खाक झाले.याचे वृत्त Lokशाही न्यूज ने प्रकाशित करताच आज सकाळी कारंजा पंचायत समिती चे सभापती चंद्रशेखर आत्राम , संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष टीकाराम चौधरी ,सुरेश ढोले यांनी किराणा किट, गहू ,तांदूळ ,डाळ यासोबतच 5 हजार रूपये नगद मदत केली. गोरे कुटुंब उघड्यावर आल्याने त्यांना फुल न फुलांची पाकळी देऊन मदत केली असल्याचे यावेळी टीकाराम चौधरी यांनी Lokशाहीला सांगितले.

घरकुल बांधकाम तातडीने मंजुरी देण्यात येईल
बेबी ताई गोरे यांचे घर आगीत खाक झाले आहे. याना तातडीने मदत देण्यासाठी तहसीलदार, गट विकास अधिकारी, यांना माहिती देऊन त्यांना लवकरच घरकुल मंजुरी देऊन कामाला सुरूवात करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे असे सभापती आत्राम यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com