Pune
PuneTeam Lokshahi

धर्मांतर, गोहत्या आणि लवजिहादविरोधात पुण्यात आज हिंदु जनआक्रोश मोर्चा

लाल महलापासून ते डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

पुणे : धर्मांतर, गोहत्या आणि लव जिहाद यासाठी कडक कायदे करावेत. त्याची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस धर्मवीर दिन म्हणून साजरा करावा. या मागणीसाठी पुण्यात सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. लाल महलापासून ते डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

या मोर्चात आमदार शिवेंद्र राजे भोसले, आमदार भीमराव तापकीर, तेलंगणाचे आमदार राजा भैया ठाकूर, मिलिंद एकबोटे, निवृत्त पोलीस अधिकारी भानू प्रताप बर्गे हे सहभागी झाले आहेत. लाल महाल येथून ११ वाजण्याच्या सुमारास मोर्चाला सुरुवात झाल्यानंतर लक्ष्मी रोडने हा मोर्चा डेक्कन परिसरातील धर्मवीर संभाजी महाराजांच्या स्मारकाजवळ पोहोचला आहे. शहरातील विविध राजकीय पक्ष, हिंदुत्ववादी संघटना, व्यापारी, गणेशोत्सव मंडळे या मोर्चात सहभागी झाले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com