ही बायको सात जन्म काय तर सात सेकंदही नको; नवऱ्याने वडाला घातल्या उलट्या फेऱ्या

वटपौर्णिमेला बायकांच्या त्रासा विरोधात नवऱ्यांनी केली वटपौर्णिमा पूजा
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

सचिन बडे | छत्रपती संभाजीनगर : वटपौर्णिमा सण, आपल्या पतीच्या आयुष्यासाठी आणि हाच पती सात जन्म मिळावा यासाठी महिला या वटपौर्णिमा साजरा करतात आणि देवाकडे प्रार्थना करतात. मात्र बायको खूप त्रास देते त्यामुळे बायको सात जन्म काय तर सात सेकंदही नको म्हणत छत्रपती संभाजी नगरातील पुरुषांनी वडाला उलट्या फेऱ्या मारल्या आहेत.

बायको मारते, त्रास देते म्हणून बायको नकोच म्हणत नवऱ्यांनी वडाला उलट्या फेऱ्या मारऱ्या आहेत. छत्रपती संभाजी नगरातील पत्नी पीडित पुरुष आश्रमातील पुरुषांनी ही वटपौर्णिमा साजरी केली. ही बायको नको म्हणत पुरुषांनी वडाला 121 उलट्या फेऱ्या मारल्या. पत्नी पीडित पुरुष संघटनेने ही वटपौर्णिमा सण साजरा केली. दहा हजार पेक्षाही जास्त पुरुषांना बायकांचा त्रास होत असल्याने हे पुरुष या संघटनेचे सदस्य आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com