Indian Army Day 2022 : आज भारतीय सैन्य दिवस

Indian Army Day 2022 : आज भारतीय सैन्य दिवस

Published by :

आज भारतीय सैन्याकडून 74 वा सैन्य दिवस साजरा केला जातोय. 15 जानेवारी हा दिवस साजरा केला जातो कारण की, 1949 साली फील्ड मार्शल जनरल करियप्पा यांनी भारताचे पहिले लष्कर प्रमुख म्हणून सूत्र स्वीकारली होती.

ब्रिटीश कमांडर इन चिफ जनरल फ्रान्सिस बचर हे ब्रिटिश भारताचे शेवटचे लष्कर प्रमुख होते. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतरही काही काळ त्यांनीच भारतीय लष्कराचे प्रतिनिधीत्व केलं. नंतर 15 जानेवारी 1949 रोजी फील्ड मार्शल जनरल करियप्पा यांनी जनरल फ्रान्सिस बचर यांच्याकडून लष्कराची सूत्रे हातात घेतली. या ऐतिहासिक क्षणानिमित्त 15 जानेवारी हा सैन्य दल दिवस म्हणून साजरा केला जातो.

पहिले भारतीय अधिकारी जनरल करियप्पा होते ज्यांनी भारतीय लष्कराचे नेतृत्व केलं. सन 1899 साली कर्नाटकातील कुर्ग जिल्ह्यात करियप्पा यांचा जन्म झाला. वयाच्या केवळ 20 व्या वर्षी त्यांनी लष्करात नोकरी सुरु केली.

जनरल करियप्पा यांनी 1947 सालच्या भारत पाकिस्तान युध्दावेळी देशाच्या पश्चिम सीमेवर लष्कराचे नेतृत्व केलं होतं. देशाची फाळणी करण्यात आली तशी लष्कराचीही विभागणी भारत आणि पाकिस्तान या दोन देशात करण्यात आली. त्यावेळी या सैन्याच्या विभागणीची जबाबदारी जनरल करियप्पा यांच्यावर सोपवण्यात आली होती

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com