शेतकऱ्यांचा मोर्चा तात्पुरता स्थगित, जेपी गावितांची माहिती; ...तर लाल वादळ मुंबईत धडकणार

शेतकऱ्यांचा मोर्चा तात्पुरता स्थगित, जेपी गावितांची माहिती; ...तर लाल वादळ मुंबईत धडकणार

शेतकऱ्यांचा लाँग मार्चच्या शिष्टमंडळासोबत आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक झाली आहे. शेतकरी शिष्टमंडळासोबत दोन तासांहून अधिक वेळ चर्चा सुरु होती

मुंबई : शेतकऱ्यांचा लाँग मार्चच्या शिष्टमंडळासोबत आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक झाली आहे. शेतकरी शिष्टमंडळासोबत दोन तासांहून अधिक वेळ चर्चा सुरु होती. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शेतकरी मोर्चाचे नेते जे.पी. गावित यांनी सांगितले आहे. अनेक मागण्यांवर निर्णय झाले असून ते उद्या अधिवेशानात मांडण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. परंतु, या निर्णयांचा जीआर निघून अंमलबजावणी न झाल्यास लाल वादळ मुंबईला धडक देईल, असा इशारा गावित यांनी दिला आहे.

जे.पी. गावित म्हणाले की, आमच्या मागण्यांवरती सकारात्मक चर्चा झाली आहे. 18 मागण्यांपैकी केंद्रच्या आधीन आसणाऱ्या काही मागण्या विचाराधीन आहे. तर, राज्याच्या पातळीवरील मागण्या नवजमीनी, कांदा, घरकुल योजनेा, अंगणावडीचा वेतन यावर सकारात्मक चर्चा झाली आहे. सरकारने आमच्या सर्व मागण्यांवर सकारात्मक आश्वासन दिले आहे. त्यातील काही मागण्यांवर निर्णय झाला आहे.

मात्र, मागील 2018 व 2019 च्या आंदोलनावेळी फक्त आश्वासनावर आंदोलन मागे घेतल्याने आंदोलकांची निराशा झाली होती. यामुळे उद्या शासनाने कॅबिनेट बैठकीत निर्णय घेऊन ते विधिमंडळ पटलावर मांडावेत व या सर्व चर्चेचे इतिवृत्त आमच्या हाती द्यावे. तसेच, याचे जीआर काढून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवावे आणि त्यांची अंमलबाजवणी सुरुवात करावी. याची खात्री पटल्यानंतरच आम्ही आंदोलन माघारी घेण्यात येईल. सोमवारपर्यंत जर शासनाने इतिवृत्त हाती दिले नाही, तर सर्व आंदोलन मुंबईच्या दिशेने धडक देतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com