Accident Death|Akola Accident
Accident Death|Akola Accident Team Lokshahi

मालट्रकला लक्झरी बसने दिली जबर धडक; 2 प्रवाशांचा मृत्यू

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

विनोद गायकवाड | दौंड : पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मालट्रक व लक्झरी बसचा भीषण अपघात झाला आहे. कुरकुंभ येथे मालट्रकला लक्झरी बसने जबर धडक दिली. यामध्ये 2 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचाराकरीता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मल्लिकनाथमठ भिगवण येथून देवदर्शन उरकून पुण्याच्या दिशेने प्रवासी खासगी बसमधून चालले होते. दरम्यान, बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसने थेट ट्रकला धडक दिली. पुणे-सोलापूर महामार्गावरील कुरकुंभ या ठिकाणी बसने ट्रकला पाठीमागून भीषण धडक दिली आहे. यामध्ये दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. दरम्यान खासगी बस चालकाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com