आप्पासाहेब धर्माधिकारी यांना अमित शहांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान

आप्पासाहेब धर्माधिकारी यांना अमित शहांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान

श्री रामाची मूर्ती, राम मंदिराची प्रतिकृती, छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती देत मान्यवरांचे स्वागत

मुंबई : राज्य शासनाच्या वतीने महाराष्ट्र भूषण 2022चा पुरस्कार ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज प्रदान करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी हा पुरस्कार देण्यात आला. या सोहळ्यावेळी एकनाथ शिंदे, सुधीर मुगंटीवार यांच्यासह मोठ्या संख्येने धर्माधिकारी यांचे समर्थक उपस्थित आहेत.

आप्पासाहेब धर्माधिकारी यांना अमित शहांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान
बिलकिस बानूंचे आरोपी, कुलदीप सिंगरांच्याबद्दल गप्प का? अतिक यांच्या हत्येवरुन सुषमा अंधारेंचा निशाणा

महाराष्ट्र माझा हे राज्यगीत वाजवत या सोहळ्याची सुरुवात केली या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणून उपस्थिती होती. यावेळी अमित शहा यांच्यासाठी आणलेला हार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना घालण्यात आला. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिकृती देत अमित शाह यांचे स्वागत केले. अमित शाह व धर्माधिकारी यांना श्रीराम मंदिराची मुर्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून स्वागत करण्यात आले. यानंतर आप्पासाहेब धर्माधिकारी यांना अमित शहा यांच्या हस्ते महाराष्ट्र पुरस्कार प्रदान करण्यात आला.

दरम्यान, श्रीरामाची मुर्ती देत प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आल्याने विरोधकांनी आता शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य केले आहे. महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात भाजप व शिवसेनेकडून हिंदुत्वाचा अजेंडा रेटण्याचा प्रत्न केला जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. याआधी पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्या कार्यक्रमात सिद्धिविनायकाची मूर्ती देत स्वागत केले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com