Vipul Ingawale
Vipul Ingawale Team Lokshahi

Satara : जवान विपुल इंगवले यांंना वीरमरण

विपुल इंगवले यांचे पार्थिव गावी दाखल

प्रशांत जगताप | सातारा : साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील भोसे गावचे सुपुत्र विपुल इंगवले (Vipul Ingawale) हे शहीद झाले आहेत. त्यांचे पार्थिव आज साताऱ्यात दाखल झाले. त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी गावकऱ्यांचा जनसागर लोटला होता. भारत माता की जय अशा घोषणा गावकऱ्यांकडून यावेळी देण्यात आल्या.

Vipul Ingawale
शाळा पुन्हा बंद? Varsha Gaikwad म्हणाल्या...

मागील वर्षी सियाचीनमध्ये कर्तव्यावर असताना बर्फवृष्टीमध्ये सापडल्याने जवान विपुल जखमी झाले होते. सुरुवातीला त्यांच्यावर दिल्ली त्यानंतर पुणे येथील सैन्य दलाच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना रविवारी त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगी दोन विवाहित बहिणी आणि भाऊ असा परिवार आहे.

Vipul Ingawale
नोटांवर दिसणार आता टागोर-कलामांचा फोटो?

सामान्य शेतकरी कुटुंबातील असलेल्या विपुल यांनी गावातच माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर रयत शिक्षण संस्थेच्या कोरेगाव येथील डी.पी.भोसले कॉलेजमध्ये पदवीचे शिक्षण घेतले. या काळात उत्कृष्ट बॉक्सर म्हणून ते पुढे आले. एन. सी.सी. कॅडेट म्हणून त्यांनी उठावदार कामगिरी केली होती. गतवर्षी सियाचीनमध्ये कर्तव्य बजावत असताना बर्फवृष्टीत ते सापडले होते. गेल्या वर्षभरापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, काल पुण्यात उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने गावावर शोककळा पसरली असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Vipul Ingawale
Sidhu Moosewala हत्या प्रकरणाचे पुणे कनेक्शन; दोन आरोपींना लूकआऊट नोटीस
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com