महाराष्ट्र
मुंबईत काँग्रेसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक, आमंत्रण न दिल्यानं नितीन राऊत माघारी?
काँग्रेस प्रभारी एच.के पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरू आहे. महाराष्ट्रातील नगरपंचायत निवडणूक निकाल, काँग्रेस मंत्र्यांच्या खात्यांची महाविकास आघाडीत निधीवाचून होणारी अडवणूक, आगामी महापालिका निवडणूकीकरता रणनितीयाबाबत चर्चा होणार आहे. दरम्यान, गेटवर बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करून नितीन राऊत बैठकीत सहभागी न होताच तिथून निघून गेले अशी चर्चा आहे.

