Ravi Rana
Ravi RanaTeam Lokshahi

रवी राणांनी साजरी केली शेकडो भगिनींसोबत रक्षाबंधन; राखीवर 'भावी मंत्रीसाहेब' उल्लेख

निराश होण्याच कारण नाही मला लवकरच मंत्री पद मिळेल; रवी राणा यांनी व्यक्त केला विश्वास

MLA Rana : संपूर्ण देशात आज रक्षाबंधन साजरा केला जात आहे. वेगवेगळ्या स्तरावर आज रक्षाबंधन साजरा केला जातो. दरवर्षी प्रमाणे यंदाही युवा स्वाभिमान पार्टीद्वारा अमरावतीत भव्य रक्षाबंधन कार्यक्रम आमदार रवी राणा यांच्या मुख्य कार्यालयात साजरी करण्यात आला. यावेळी आमदार रवी राणा यांना जिल्ह्यातील शेकडो महिलांनी राख्या बांधल्या. यावेळी चक्क भावी मंत्री साहेब असा उल्लेख असलेली राखी रवी राणा यांना महिलांनी बांधली. त्यावर रवी राणा म्हणाले की, निराश होण्याच कारण नाही मला लवकरच मंत्री पद मिळेल, असा विश्वास रवी राणा यांनी व्यक्त केला. (MLA Rana celebrated Rakshabandhan with sisters)

Ravi Rana
नशिबाची थट्टा! लाठ्या-काठ्यांचा खेळ करणाऱ्या आजीबाई फसवणुकीमुळे पुन्हा रस्त्यावर

रवी राणा यांना मंत्री पद मिळालं नसल्याने महिला नाराज झाल्याने, यावर रवी राणा यांनी बोलतांना सांगितले की, निराश होण्याच कारण नाही अर्ध मंत्री मंडळ झालं अर्ध बाकी आहे. मी १० वर्षांपासून देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहे. तर मी मंत्री पदाची मागणी केली नाही. पण, अमरावती जिल्ह्याला देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री शिंदे न्याय देतील, अशी अपेक्षा रवी राणा यांनी यावेळी व्यक्त केली. राखी बांधण्यासाठी आलेल्या सर्व महिलांना तिरंगा वाटप करण्यात आला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com