पुण्यात मनसे-भाजप युती होणार ? राज ठाकरे म्हणाले…

पुण्यात मनसे-भाजप युती होणार ? राज ठाकरे म्हणाले…

Published by :

अमोल धर्माधिकारी | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील निवडक शहरांचा दौरा सूरू केला आहे. सध्या ते पुणे दोऱ्यावर असून पुण्यातील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. यावेळी आजच्या बैठकीत एका पदाधिकऱ्यानी भाजपसोबत जाणार काय ? असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नावर त्यांनी मी काय पक्ष गहाण ठेवायला काढलाय का ? या शब्दात उत्तर दिले आहे.

राज्यातील आगामी दहा महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडक शहरांचा दौरा सुरू केला आहे. नाशिक येथील दौऱ्यानंतर राज ठाकरे पुण्यात आहेत. यावेळी पुणे दौऱ्यात त्यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

दरम्यान आजच्या बैठकीत एका पदाधिकऱ्यानी भाजपसोबत जाणार काय ? असा प्रश्न विचारला असता, मी काय पक्ष गहाण ठेवायला काढलाय का ? अशा शब्दात त्यांनी उत्तर दिले. आपण आपल्या ताकदीवर लढायचे, पक्षाच्या सूचनांचे पालन करा, असा सल्ला राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला. तसेच गाफील राहू नका,आगामी निवडणुका पाहून कामाला लागा. कुणी उल्लंघन केल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा ही त्यानी दिलाय. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत मनसे स्वतःच्या ताकदीवर लढणार आहे. तसेच आगामी काळात मनसे भाजप युती होण्याची शक्यता नसल्याचे त्यांनी येथे स्पष्ट केले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com