मुंबईकरांनी अनुभवला 'झिरो शॅडो डे'; फोटो सोशल मीडियावर व्हायरल

मुंबईकरांनी अनुभवला 'झिरो शॅडो डे'; फोटो सोशल मीडियावर व्हायरल

राज्यातील अनेक भागात लोकांनी सोमवारी दुपारी झिरो शॅडो डे म्हणजेच शून्य सावली दिवस म्हणून ओळखल्या जाणार्‍या दुर्मिळ खगोलीय घटना पाहिल्या.

रिध्देश हातीम | मुंबई : राज्यातील अनेक भागात लोकांनी सोमवारी दुपारी झिरो शॅडो डे म्हणजेच शून्य सावली दिवस म्हणून ओळखल्या जाणार्‍या दुर्मिळ खगोलीय घटना पाहिल्या. या दिवशी सूर्यप्रकाशामुळे सावली तयार होत नाही. सावली नसताना अनेकांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर व्हिडिओ आणि फोटो पोस्ट केली आहेत.

युझर्सनी 'झिरो शॅडो डे'चे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात केले आहेत. यात काही मिनिटांसाठी वस्तूंची सावली दिसत नाही. शून्य सावली दिवस ही वर्षातून दोनदा घडणारी घटना आहे. शून्य सावली दिवसादरम्यान, सूर्य आकाशातील सर्वोच्च बिंदूवर पोहोचतो. यामुळे सावलीची लांबी कमी होते. जेव्हा आपण या सावलीवर उभे राहतो तेव्हा आपली स्वतःची सावली अदृश्य होते. म्हणूनच शून्य सावली अशी संज्ञा आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com