गणेशोत्सवात रेल्वे बुकिंगचा घोळ; नारायण राणे घेणार केंद्रीय रेल्वे मंत्र्यांसोबत बैठक

गणेशोत्सवात रेल्वे बुकिंगचा घोळ; नारायण राणे घेणार केंद्रीय रेल्वे मंत्र्यांसोबत बैठक

गणरायाच्या आगमनाच्या दोन दिवस आधीचे म्हणजेच १७ सप्टेंबरचे रेल्वेचे आरक्षण अवघ्या काही मिनिटांतच फुल्ल झाले आहेत

मुंबई : गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांनी कोकणात जाण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र यंदाही गणरायाच्या आगमनाच्या दोन दिवस आधीचे म्हणजेच १७ सप्टेंबरचे रेल्वेचे आरक्षण अवघ्या काही मिनिटांतच फुल्ल झाले आहेत. यावर विरोधकांनी टीका केली होती. यासंदर्भात केंद्रीय मंत्री नारायण राणे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व अधिकाऱ्यांसोबत सोबत सोमवारी २९ मे रोजी बैठक घेणार आहेत. याबाबत आमदार नितेश राणे यांनी माहिती दिली आहे.

गणेशोत्सवात रेल्वे बुकिंगचा घोळ; नारायण राणे घेणार केंद्रीय रेल्वे मंत्र्यांसोबत बैठक
राज्यात निवडणूक होणारच नाही अशी परिस्थिती निर्माण होईल : उध्दव ठाकरे

गणपतीच्या दिवसांसाठी कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचे १७ सप्टेंबर या प्रवासाच्या तारखेच्या १२० दिवस आधीचे आरक्षण शुक्रवारी खुले झाले होते. मात्र, पहिल्याच दिवशी तीन मिनिटांतच आरक्षण फुल झाल्याने भक्तांच्या पदरी निराशा पडली. या तर प्रतिक्षा यादीचे लांबच्या लांब फलक लागले आहेत. यावर रेल्वेच्या आरक्षणात गैरप्रकार होत असण्याची शक्यता प्रवाशांकडून वर्तविण्यात आली आहे. याची दखल घेत नारायण राणे यांनी सोमवारी अश्विनी वैष्णव यांची भेट घेणार आहेत. या बैठकीत योग्य तो निर्णय घेऊन चाकरमान्यांना गावी जाण्याचा प्रवास सुखकर केला जाईल, असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com