शरद पवारांना मोठा धक्का! राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय दर्जा निवडणूक आयोगाकडून रद्द

शरद पवारांना मोठा धक्का! राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय दर्जा निवडणूक आयोगाकडून रद्द

केंद्रीय निवडणूक आयोगाने अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला (आप) राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द केला आहे. यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीसोबत आणखी दोन पक्षांचाही राष्ट्रीय दर्जा काढण्यात आला आहे. तर, अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला (आप) राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला आहे.

शरद पवारांना मोठा धक्का! राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय दर्जा निवडणूक आयोगाकडून रद्द
बावनकुळे वेस्ट इंडीजच्या खेळाडूसारखे दिसतात; जाधवांच्या टीकेला चित्रा वाघांचे प्रत्युत्तर, अरे भास्कर, आता बस कर..!

निवडणूक आयोगाने तीन राष्ट्रीय पक्ष आणि दोन प्रादेशिक पक्षांचा दर्जा काढून घेतला आहे. त्याचबरोबर एका पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आला. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, तृणमूल काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला आहे. याशिवाय आम आदमी पक्षाला आता राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे.

नियमांनुसार, राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी पक्षांना एकूण मतांपैकी सहा टक्के मतांची आवश्यकता असते. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सहा टक्के मते मिळालेले नाहीत, अशी चर्चा आहे. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे विजयी उमेदवारांची संख्या कमी झाली होती. त्यामुळेच निवडणूक आयोगाकडून ही मोठी कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना 1998 साली झाली होती. सलग 15 वर्ष राष्ट्रवादी राज्यात सत्तेत होता. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देशाचे केंद्रीय कृषीमंत्रीदेखील राहीले होते. परंतु, आज केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीचा राष्ट्रीय दर्जा रद्द केला आहे. यामुळे राष्ट्रवादी पक्षाला आता प्रादेशिक पक्षाचा दर्जा राहणार आहे. या निर्णयाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आगामी निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com