महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर नक्षलवाद्यांचा पोलिसांवर हल्ला; दोन शहीद

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर नक्षलवाद्यांचा पोलिसांवर हल्ला; दोन शहीद

महाराष्ट्रातील गोंदियाला लागून असलेल्या सीमेवर हा हल्ला झाला

गोंदिया : छत्तीसगढमध्ये पुन्हा एकदा नक्षलवाद्यांनी पोलिसांवर हल्ला केला आहे. महाराष्ट्रातील गोंदियाला लागून असलेल्या सीमेवर हा हल्ला झाला असून यामध्ये दोन जवान शहीद आणि एक जण जखमी झाले आहेत. शहीद झालेले दोन पोलिस हे छत्तीसगडचे आहेत.

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर नक्षलवाद्यांचा पोलिसांवर हल्ला; दोन शहीद
शिवसेना विधीमंडळ कार्यालयावर शिंदे गटाने घेतला ताबा

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर नाका बंदिस्त करताना आज सकाळी आठच्या सुमारास अचानक नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात दोन जवान शहीद झाले. या घटनेची माहिती मिळताच अतिरीक्त फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. या प्रकरणाचा तपास केला जात आहे. हा परिसर नक्षलग्रस्त असल्याचे सूत्रांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com